Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : खेडमध्ये पाळीव जनावरांत ‘लम्पी स्कीन’सदृश लक्षणे

मांडवे येथील पाळीव जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजारसदृश लक्षणे आढळून आली. त्या संशयित जनावरांच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

खेड, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील मांडवे येथील शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी स्कीनसदृश लक्षणे (Lumpy Skin Symptoms In Pet) आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) गुरुवारी (ता. २२) पंचक्रोशीतील गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांना या आजारासंबंधी माहिती देऊन जनावरांच्या लसीकरणावर (Lumpy Vaccination) भर दिला आहे.

मांडवे येथील पाळीव जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजारसदृश लक्षणे आढळून आली. त्या संशयित जनावरांच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या पंचक्रोशीतील ६४ जनावरांना तातडीने लसीकरण करण्यात आले.

तसेच गुरुवारी सकाळपासूनच मांडवे, तळेसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील जनावरांची पाहणी करण्यात आली, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी दिली.

त्या संशयित जनावरांचे रक्तांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके निदान होणार असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

पशुधन विकास आयुक्त यांनी तालुक्यात सर्वत्रच क्लिन व्हॅक्सिनेशनचे आदेश दिले असून आगामी कालावधीत सर्वच भागामध्ये जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. लस प्राप्त होताच त्याचे नियोजन करण्यात येईल.- डॉ. विनया जंगले, पशुधन विकास अधिकारी, खेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT