Spider Lily Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care: जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा

लिली वनस्पतीच्या विविध प्रजातीपैकी, स्पायडर लिली (Spider Lily) या वनस्पतीचे फूल मोठे पांढरे व सुगंधी असते.

Team Agrowon

डॉ. नितीन जाधव, डॉ. कीर्ती तांबे

बागेत, घरातील कुंड्यांमध्ये लिली लागवड केली जाते. लिली वनस्पती अंब्राईलीडायसी कुटुंबातील आहे. या वनस्पतीची उंची ६० ते ७० सेंटिमीटर असून त्याचा कांदा ७ ते १० सेंटिमीटर रुंद असतो. वयानुसार कांद्याला मान येते. ती साधारण चार ते पाच सेंटिमीटर रुंद असते. लिली वनस्पतीच्या विविध प्रजातीपैकी, स्पायडर लिली (Spider Lily) या वनस्पतीचे फूल मोठे पांढरे व सुगंधी असते.

लिली या वनस्पतीच्या विविध प्रजाती आहेत. स्पायडर लिलीचा कांदा सर्वात जास्त विषारी मानला जातो. अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे, की लिली वनस्पती ही मांजर व श्‍वानांमध्ये जास्त घातक असते.

१) लिली वनस्पती मांजराने सेवन केली आणि योग्य वेळी उपचार झाले नाही तर तीन दिवसांच्या आत मांजराच्या किडनीवर घातक परिणाम होतो.

२) सुरुवातीच्या बारा तासांच्या आत उलटी येणे, मळमळणे, हगवण लागणे आणि शरीरातील पाणी कमी होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतरच्या १२ ते २४ तासात सतत लघवी, हगवण लागते. शरीरातील पाणी कमी ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. उपचारास १८ तासांपेक्षा जास्त विलंब झाल्यास पुढील २४ ते ७२ तासात किडनी निकामी होते. प्राणी दगावण्याची शक्यता वाढते.

मेंढ्यांमधील विषबाधाः

काही दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी (जि. परभणी) या ठिकाणी १० ते १५ मेंढयांमध्ये स्पायडर लिली (Spider Lily) या वनस्पतीची विषबाधा आढळून आल्याची शक्यता दिसून आली आहे. जे पशुपालक मेंढी सोबत होते, त्यांच्यानुसार ही विषबाधा (Poisoning) लिली या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे असू शकतो असा अंदाज आहे. विषबाधा झालेल्या मेंढयामध्ये पोटफुगी, खाद्य न खाणे, अस्वस्थपणा वाटने, संडास व लघवी न येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून आली.

तीन दिवसांमध्ये १५ मेंढ्यांचा मृत्यू दिसून आहे. लिली वनस्पतीची विषबाधा जरी मांजरांमध्ये नोंद असली तरी पहिल्यांदा मेंढयांमध्ये या वनस्पतीची बाधा व मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना ज्या ठिकाणी लिलीची वनस्पती आहे, त्या भागात चरण्यास पाठवू नये.

संपर्कः डॉ. नितीन जाधव, ९९६०९००८२०

(लेखक पशुऔषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT