Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Sheep Goat Market : सोलापूरच्या खासगी बाजाराचा मुरुडच्या पारंपरिक शेळी-मेंढी बाजाराला फटका

Livestock Market : खासगी बाजारात येण्यासाठी खरेदीदार व व्यापाऱ्यांवर दबाव टाकण्यासह मुरुड व सोलापूर बाजारात शेळ्यामेंढ्यांना घेऊन जाणारी वाहनेही अडवल्याचे प्रकार घडले.

Team Agrowon

Latur News : सोलापूर शहर बक्कर कसाब असोसिएशनने मंगळवारपासून (ता. १८) विजापूर हायवेवरील नंदुरगांव (ता. उत्तर सोलापूर) शिवारात शेळ्यामेंढ्यांचा खासगी आठवडी बाजार सुरु केल्यामुळे मुरुड (ता. लातूर) येथे मागील पन्नास वर्षापासून सुरु असलेल्या शेळीमेंढी बाजाराला मोठा फटका बसला आहे.

मंगळवारी मुरुडचा बाजार अर्ध्यावर आला. खासगी बाजारात येण्यासाठी खरेदीदार व व्यापाऱ्यांवर दबाव टाकण्यासह मुरुड व सोलापूर बाजारात शेळ्यामेंढ्यांना घेऊन जाणारी वाहनेही अडवल्याचे प्रकार घडले.

नव्या बाजारात येण्यावरुन व्यापाऱ्यांत झालेल्या शाब्दिक चकमकीही सोशल मिडियावर व्हायरल झाल्या असून सोलापूरच्या खासगी बाजाराची जाहिरात सुरु असताना मुरुड येथील ग्रामपंचायत हातावर हात ठेवून बसल्यानेही संताप व्यक्त होत आहे.

राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड येथे ७० वर्षापासून जनावरांचा बाजार भरतो. बाजारात शेळ्यामेंढ्यांची आवक वाढल्यामुळे ग्रामपंचायतीने बाजाराचे विभाजन करत सोमवारी जनावरांचा तर मंगळवारी शेळ्यामेंढ्यांचा बाजार सुरु केला. रात्री बारापासूनच बाजाराला सुरवात होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत बाजार संपतो. बाजारात काही तासात सात कोटीची उलाढाल होते.

तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक व अन्य राज्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी व खरेदीदार बाजारात येतात. यातच सोलापूर शहर बक्कर कसाब असोसिएशनने १८ फेब्रुवारीपासून स्वतंत्र खासगी बाजार सुरु करण्याचे नियोजन केले. बाजाराची जाहिरातबाजीची पॉम्प्लेट व सोशल मिडियावर करण्यात आली. परराज्यातील विशेषतः कर्नाटकातून व कर्नाटकमार्गे येणाऱ्या खरेदीदारांना खासगी बाजारात येण्यासाठी सक्ती करण्यात आली.

त्यांच्याकडून बाजारातील सहभागाबाबत लेखीही घेतले. मुरुडला दरबाजारी येणाऱ्याव्यापारी व खरेदीदारांनाही खासगी बाजारात येण्यासाठी आमिष दाखवले. यात परभणीमार्गे येणाऱ्यांनी सोलापूरचे जास्तअंतर व खर्चाचे कारण सांगत नव्या बाजारात येण्यास नकार दिला.

सोलापूरच्या बाजाराच्या पदाधिकाऱ्यांनी जातीचे हत्यार उपसत व्यापाऱ्यांना गळ घातली. या संवादाच्या ऑडिओ क्लीपही सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. या घडामोडी सुरु असताना ग्रामपंचायतीने काहीच हालचाल केली नाही.

बाजार ठेकेदाराने एकाकी केलेले प्रयत्न अपुरे पडले. यामुळे मंगळवारी खासगी बाजार शेळ्यामेंढ्यांनी फुलला. तर दुसरीकडे मुरुडच्या बाजारात शेळ्यामेंढ्यांची आवक निम्यावर आली. बाजारपेठेतील व्यवहारही थंडावले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT