Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat-Sheep Farming Project : शेळी-मेंढी समूह प्रकल्पासाठी पारनेरमधील ढवळपुरीची निवड

राज्यामध्ये समूह विकासामधून शेळी-मेंढीपालन व्यवसायास गती देऊन शेळी- मेंढीपालन संबंधित नवीन उद्योजक निर्माण करणे.

Team Agrowon

Nagar News : महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळीपालनास महत्त्वाचे स्थान आहे. शेळीपालन (Goat Farming) हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरलेला आहे.

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळी-मेंढी समूह प्रकल्प व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या या नवीन प्रक्षेत्राचा महाराष्ट्रदिनी (ता. १ मे) प्रारंभ होणार आहे.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी-मेंढी पालनाकडे पाहिले जाते. राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेळी-मेंढी पालन करतात.

त्या पार्श्‍वभूमीवर पालकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचा शेळी-मेंढी समूह प्रकल्प मंजूर झाला आहे.

त्या संदर्भात मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.

प्रधान सचिव जगदीशप्रसाद गुप्ता, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे उपस्थित होते.

राज्यामध्ये समूह विकासामधून शेळी-मेंढीपालन व्यवसायास गती देऊन शेळी- मेंढीपालन संबंधित नवीन उद्योजक निर्माण करणे.

शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्या माध्यमातून त्यांना शेळी-मेंढीपालन व्यवसायाकरिता प्रवृत्त करून त्यांचे या व्यवसाया बाबतचे कौशल्य विकसित करणे व त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार निर्मिती होऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचविण्यास यामुळे मदत होणार आहे.

या भागातील शेळी-मेंढीपालकांना सतत निर्माण होणारा शेळ्या व मेंढ्यांच्या विपणन व्यवस्थेचा प्रश्‍नही सुटणार आहे.

या प्रकल्पांतर्गत शेळ्या- मेंढ्यापासून मिळणाऱ्या विविध पदार्थ व उपपदार्थ यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक निर्माण होऊन रोजगार निर्मिती सुद्धा होईल. नगर जिल्ह्यामध्ये शेळी उद्योगाच्या माध्यमातून शाश्‍वत विकास साध्य करता येणार आहे.

शेतीला शेळी-मेंढीपालन हा पूरक व्यवसाय फायदेशीर असून, राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने ढवळपुरी येथे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी निश्‍चित लाभदायक ठरणार आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील, पशुसंवर्धनमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT