calf Agrowon
काळजी पशुधनाची

वासराच्या नाळेचा संसर्ग कसा रोखाल?

वासराचा जन्म झाल्यानंतर वासराची नाळ असुरक्षितरित्या कापली गेल्याने, वासराच्या बेंबीच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होत असतो.

Team Agrowon

वासराचा (calf) जन्म झाल्यापासून ते सहा महिन्याचे होईपर्यंतचा काळ त्याच्या निरोगी वाढीसाठी महत्त्वाचा असतो. या काळात वासराच्या व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्यास वासराच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. वासराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास, वासराला विविध आजारांची बाधा होण्याची शक्यता असते. वासराची वाढ योग्य प्रकारे न झाल्यास ते लवकर वयात येऊन उत्पादनक्षम होण्यास विलंब लागतो.

अपुरा किंवा अतिरिक्त आहार यामुळे वासरांची पचनशक्ती बिघडते. वासराचा जन्म झाल्यानंतर वासराची नाळ (Navel cord) असुरक्षितरित्या कापली गेल्याने, वासराच्या बेंबीच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होत असतो. हा संसर्ग वाढत जाऊन,वासराच्या बेंबीला सूज येत असते.

वासराच्या बेंबीला सूज येणे. वासराच्या जन्मानंतर ज्या भागात नाळ लोंबकळत असते, तो भाग म्हणजे बेंबी. काही वेळेस या भागाला संसर्ग होऊन सूज येते, परिणामी त्यामध्ये पू होतो. त्याचे विष तयार होऊन ते संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे वासरांना ताप येतो, वासरे दूध, चारा व पाणी याकडे दुर्लक्ष करतात, पांढरी पिवळसर रंगाची हगवण लागते. वासरे अशक्त बनतात. त्वचा खरबरीत बनते. योग्य वेळी उपचार न झाल्यास वासरे दगावण्याची दाट संभावना असते. साधारणतः हा आजार रेडकांमध्ये जास्त आढळून येतो.

उत्कृष्ट व्यवस्थापनातून वासराच्या मरतुकिचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी करता येते. वासराचा जन्म झाल्यानंतर नाळ कापण्यासाठी निर्जंतुक सीझरचा वापर करावा. नाळ कापल्यानंतर ती टिंक्चर आयोडीन मध्ये बुडवून घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT