Poultry  Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसायिकांना हवी वीजदरात सवलत

Poultry Industry : राज्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. परिणामी, विजेवर मोठा खर्च होत आहे.

Team Agrowon

Nagpur News : ‘‘राज्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. परिणामी, विजेवर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे कुक्‍कुटपालकांना कृषिपंपाप्रमाणे सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याबाबत ऊर्जा विभागाला विनंती करून त्यामाध्यमातून ‘महावितरण’ला निर्देश द्यावेत,’’ अशी मागणी पशुसंवर्धन आयुक्‍त हेमंत वसेकर यांनी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या सचिवांकडे केली.

पशुसंवर्धन आयुक्‍तांच्या पत्रानुसार, पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वय समितीचे गठण पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेवरून करण्यात आले आहे. या समितीच्या आजवर २५ जानेवारी, १३ एप्रिल आणि १५ जून रोजी बैठका झाल्या.

यात विविध पोल्ट्री क्षेत्रातील विविध समस्यांसोबतच वीज दराबाबतचा मुद्दाही सातत्याने मांडण्यात आला आहे. कंत्राटी आणि वैयक्‍तिक स्तरावर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. या शेतकऱ्यांकडून व्यावसायिक दराने वीज देयक आकारणी होते. परिणामी, त्यांना नुकसान सोसावे लागत आहे.

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर कृषिपंपाच्या दरानुसार विद्युत दर आकारणीबाबत पोल्ट्री व्यवसायिकांची मागणी आहे. ती लक्षात घेता यापूर्वी शासनास प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. पशुपालकांच्या मागणीनुसार वीज देयक दरात दिलासा देण्यासाठी शासनाच्या ऊर्जा विभागास विनंती करून याबाबत ‘महावितरण’ला निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

ग्रामपंचायत कर तसेच वीज देयक अधिक येत असल्याने उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे पोल्ट्री शेडचा भाग हा शेतीच समजावा. त्यासोबतच कृषिपंपाप्रमाणे युनिटची आकारणी करावी. त्यातून पोल्ट्री उत्पादकांचे हित साधेल.
- अतुल पेरसपुरे, संचालक, अमरावती जिल्हा पोल्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT