Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care: पावसाळी वातावरणात जनावरांत रोगांची शक्यता

ज्या पद्धतीने पीक कीड, रोग व्यवस्थापनासाठी संभाव्य हवामान बदलाचा अंदाज घेत संभाव्य उपाययोजना केल्या जातात, त्याच पद्धतीने आता पशुसंवर्धन विभागातर्फे पुढील दोन महिन्यांत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात जनावरांमध्ये रोगाच्या संभाव्य साथी येऊ शकतात, याचा अंदाज प्रसारित केला जातो.

Amit Gadre

पुणेः हवामान बदलाचा (Climate Change) प्रतिकूल परिणाम विविध पिकांच्या बरोबरीने जनावरांच्या आरोग्यावर देखील होताना दिसतो. हंगामातील बदल आणि तापमानातील अचानक चढ-उतारामुळे दरवर्षी जनावरांच्यामध्ये विविध विषाणू आणि जिवाणूजन्य रोगांच्या साथी दिसतात. त्यामुळे पशुपालकांचे नुकसान होते. ज्या पद्धतीने पीक कीड, रोग व्यवस्थापनासाठी संभाव्य हवामान बदलाचा अंदाज घेत संभाव्य उपाययोजना केल्या जातात, त्याच पद्धतीने आता पशुसंवर्धन विभागातर्फे पुढील दोन महिन्यांत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात जनावरांमध्ये रोगाच्या संभाव्य साथी येऊ शकतात, याचा अंदाज प्रसारित केला जातो. यामुळे रोग नियंत्रणासाठी (Decease Control) लसीकरण किंवा प्राथमिक उपाययोजनांची तयारी करणे सोपे होत आहे.

पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाचे सहआयुक्त डॉ. विनायक लिमये म्हणाले, ‘‘रोग अन्वेषण विभागातर्फे दर महिन्याच्या १५ तारखेदरम्यान पुढील दोन महिन्यांत जनावरांमध्ये जिल्हानिहाय कोणत्या संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, याची माहिती सर्व पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयांना दिली जाते. तेथून क्षेत्रीय स्तरावरील पशुतज्ज्ञांपर्यंत ही माहिती पोहचते. हे पशुतज्ज्ञ त्यानुसार संभाव्य रोगाबाबत पशुपालकांना जागरूक करतात. संभाव्य रोग नियंत्रणासाठी लसीकरण, उपाययोजनांचा अवलंब केला जातो.’’

जिल्हानिहाय संभाव्य रोग प्रसाराचा आराखडा तयार करण्यासाठी बंगळूर येथील ‘निवेदी’ या राष्ट्रीय संशोधन संस्थेने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये संबंधित जिल्ह्यातील महिनानिहाय हवामान, मागच्या वर्षी संबंधित महिन्यातील हवामानातील बदल तसेच कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्याची माहिती आणि संबंधित जिल्ह्यातील पशुधनाची संख्या हे प्रमुख घटक लक्षात घेऊन पुढील दोन महिन्यांत या जिल्ह्यात कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज कळतो.

स्थानिक पातळीवरूनही आम्ही माहिती गोळा करत असतो. गेल्या दोन वर्षांपासून पशुसंवर्धन विभागाद्वारे संभाव्य रोग प्रसाराचा अंदाज आम्ही प्रसारित करत आहोत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील पशुधनांमध्ये होणारा रोग प्रसार तातडीने आटोक्यात आणण्यात यश येत आहे. या अंदाजानुसार पशुसंवर्धन विभागाला रोगप्रतिकारक लसीकरण तसेच रोग नियंत्रण उपाययोजनांची तयारी करणे शक्य होते.

जुलै, ऑगस्टमधील संभाव्य रोग प्रादुर्भावाचा अंदाजः

पशुसंवर्धन विभागाच्या रोग अन्वेषण विभागातील पशुधन विकास अधिकारी डॉ. अर्चना जगताप म्हणाल्या, ‘‘आमच्या विभागातील सॉफ्टवेअरद्वारे जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्हानिहाय कोणत्या रोगाची साथ येऊ शकते, याचा अनुमान हाती आला आहे. त्यानुसार जिल्हानिहाय पशुसंवर्धन विभागातील पशूतज्ज्ञांना माहिती देण्यात आली आहे.’’

जुलै महिन्यातील स्थिती

जिल्हा --- संभाव्य रोग ---प्रादुर्भाव पातळी

१) नगर --- घटसर्प--- अति जास्त शक्यता

-------- पीपीआर (शेळी, मेंढी) --- अति जास्त शक्यता

२) अमरावती --- घटसर्प ---अति जास्त शक्यता

----------------थायलेरिया --- अति जास्त शक्यता

३) नाशिक --- घटसर्प --- जास्त शक्यता

----------------थायलेरिया --- अति जास्त शक्यता

४) अकोला ---घटसर्प --- अति जास्त शक्यता

५) पुणे ---पीपीआर (शेळी, मेंढी) --- अति जास्त शक्यता

६) नागपूर ---पीपीआर (शेळी, मेंढी) ---अति जास्त शक्यता

ऑगस्ट महिनाः

जिल्हा --- संभाव्य रोग ---प्रादुर्भाव पातळी

१) नगर --- लाळ्या खुरकूत--- अति जास्त शक्यता

-------- पीपीआर (शेळी, मेंढी) --- मध्यम शक्यता

२) लातूर ---- फऱ्या --- जास्त शक्यता

३) जळगाव --- घटसर्प --- अति जास्त शक्यता

४) उस्मानाबाद --- पीपीआर (शेळी, मेंढी)---मध्यम शक्यता

५) सांगली --- पीपीआर (शेळी, मेंढी)---मध्यम शक्यता

६) वर्धा--- पीपीआर (शेळी, मेंढी) --- मध्यम शक्यता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT