Pig Farming Management
Pig Farming Management  Agrowon
काळजी पशुधनाची

डुकरांचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Roshani Gole

वराहपालन करताना पांढऱ्या रंगाच्या विदेशी लार्ज व्हाईट यॉर्कशायर (Large white Yorkshire) डुकरांना (pig) जास्त पसंती दिली जाते. वराह पालन व्यवसायाच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास, डुकरांच्या मांसाला मागणी जास्त असते. मात्र त्या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाही.
वराहपालन (pig farming ) सुरू करताना वराहांच्या वाढीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वजनात जास्त वाढ होणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी. वराहपालन व्यवसायात फार्मवरील नियोजन, वराहांचे संगोपन, त्यांचे आहार व्यवस्थापन या गोष्टीना फार महत्त्व आहे.

वराहांची मादी गाभण असताना आहाराचे योग्य व्यवस्थापन गरजेचं आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार गाभण मादी वराहांचे स्वतंत्र व्यवस्थापन करावे. त्यांना पिण्यासाठी स्वतंत्र पाण्याची सोय करावी. वराहांचा गाभण कालावधी साधारणपणे ११४ दिवसांचा असतो. विण्याच्या एक आठवडा आधी गाभण मादीचे वेगळे व्यवस्थापन गरजेचं आहे.

शेडची जागा उंचावर आणि हवेशीर असावी. फरशी सपाट आणि काहीशी खरबरीत असावी. मात्र सहज स्वच्छ करता येण्यासारखी असावी.

वराहांसाठी शेड उंच व कोरड्या ठिकाणी तयार करावी. शेड हवेशीर असावी. शेडमधील मलमूत्र नियमित स्वच्छ करावे. जेणेकरून कुठल्याही आजाराचा प्रसार होणार नाही. कोणत्याही रोगाचा संशय असल्यास, ताबडतोब पशुवैद्याकडून तपासणी करून घ्यावी. वराहांमध्ये स्वाइन फ्लू (Swine flue), आफ्रिकन स्वाइन फीवर (African swine fever), धनुर्वात (Titanus)या रोगाविरुद्ध नियमित लसीकरण करून घ्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT