Poultry Market Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Tax : पोल्ट्रीवरील ग्रामपंचायत कर आकारणीप्रश्‍नी पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ

Department Of Animal Husbandry : कुक्‍कुटपालन व्यावसायिकांना ग्रामपंचायतींकडून आकारण्यात येणारा कर रद्द करावा, अशी मागणी आहे. त्यावर चर्चेसाठी पुन्हा एकदा पशुसंवर्धन खात्याकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : कुक्‍कुटपालन व्यावसायिकांना ग्रामपंचायतींकडून आकारण्यात येणारा कर रद्द करावा, अशी मागणी आहे. त्यावर चर्चेसाठी पुन्हा एकदा पशुसंवर्धन खात्याकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात सोमवारी (ता. २) सकाळी ११ वाजता ही बैठक होईल.

शेतीपूरक व्यवसायाच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतात शेड उभारतात किंवा तत्सम बांधकाम करतात. या बांधकामासाठी आठ-अ घेतल्यास ग्रामपंचायतीकडून अशा बांधकामावर कर आकारला जातो. हा कर मनमानी पद्धतीने आकारला जात असल्याचा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा आरोप आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी यात आघाडी घेतल्याचे सांगितले जाते.

त्यातही गावापासून लांब शेतात असलेल्या या बांधकामांना कोणत्याही सुविधा ग्रामपंचायतस्तरावरून दिल्या जात नाहीत. दिवाबत्ती, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठाही होत नाही. अशा स्थितीत हा कर आकारणे चुकीचे असल्याचे पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे. पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने कुक्‍कुट समन्वय समितीचे गठण केले होते. या समितीच्या बैठकांमध्ये देखील सातत्याने हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने त्याची दखल घेत ग्रामविकास विभागाकडे यावर पाठपुरावा केला. परंतु ग्रामविकास विभागाने या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला नाही. आता पुन्हा एकदा या विषयावर बैठक होणार आहे.

या वेळी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याने या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. राज्यातून या बैठकीकरीता सुदर्शन पोकळे, धनंजय आहेर, अनिल खामकर, शरद गोडांबे विलास साळवी, शुभम महल्ले, शशिकांत तीसगे, धनंजय डांगे, मिलींद चौधरी यांना पाचारण करण्यात आले आहे.

पोल्ट्री व्यवसायासाठी शेतात बांधण्यात आलेल्या शेड व इतर बांधकामांना ग्रामपंचायतीकडून कोणत्याच मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. असे असताना अवाजवी कराची आकारणी मात्र होते. याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. गेल्या काही वर्षात कुक्‍कुट समन्वय समितीसमोरही हा मुद्दा मांडला गेला. पशुसंवर्धन खात्याने ग्रामविकास खात्याकडे पत्रव्यवहार केला. परंतु याला दाद मिळाली नसल्याने प्रश्‍न कायम होता. आता यावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.
- रवींद्र मेटकर, सदस्य, कुक्‍कुट समन्वय समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT