Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सात जिल्ह्यात शंभर जनावरांचा मृत्यू

मराठवाड्यातील आठ पैकी सात जिल्ह्यात लम्पी आजाराने जनावरांना आपल्या विळख्यात घेतले आहे. रविवार (ता. २) पर्यंत या सातही जिल्ह्यात जवळपास १०३ जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ पैकी सात जिल्ह्यात लम्पी आजाराने (Lumpy Disease) जनावरांना आपल्या विळख्यात (Animal Died Due To Lumpy Skin) घेतले आहे. रविवार (ता. २) पर्यंत या सातही जिल्ह्यात जवळपास १०३ जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

मराठवाड्यात लातूरमध्ये १५, औरंगाबाद ४८, बीड ६, जालना जिल्हयात १२, उस्मानाबाद ४, नांदेड १७, हिंगोली १, लम्पी बरोबरच गोठ्यातील स्वच्छतेचा प्रश्न, सकस आहाराची कमतरता, शरीरातील हिमोग्लोबिन कमी करणाऱ्या इतर आजारांची झालेली लागण आदींमुळे जनावरांचा मृत्यू होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात २ ऑक्टोबर अखेर एकूण १७४८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

उपचाराने जनावरे बरे होत असली तरी आजारी जनावरांपैकी मृत्यू होणाऱ्या जनावरांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या चिंता वाढवते आहे त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांची स्वच्छता राखण्या सोबतच त्यांना सकस खाद्य देण्यावर विशेष भर देण्यात ण्याची गरज असल्याचेही पशुवैद्यकांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद मध्ये ४८ मृत्यू

लम्पीमुळे मराठवाड्यात सर्वाधिक ४८ जनावरांचे मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या ९१४ इतकी आहे. त्यापैकी ५७६ जनावर उपचाराने बरे झाले असून २७८ बाधित जनावरांवर सद्यःस्थितीत उपचार सुरू आहेत. त्यामध्ये सिल्लोडमधील ७५, सोयगावमधील ६३, पैठणमधील ४२, कन्नडमधील ४७, फुलंब्रीतील ७, गंगापूरमधील ८, वैजापूरमधील ५ व खुलताबादमधील ७ जनावरांचा समावेश, असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

औरंगाबाद मध्ये ८३ टक्के लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ५ लाख ३५ हजार गोवर्गीय जनावरांपैकी ४ लाख ४१ हजार ४४१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्थांचेही योगदान लाभले आहे. जिल्ह्याला सुरवातीला शासनाकडून तीन लाख ९५ हजार लस मात्र उपलब्ध करून देण्यात आली होती आता पुन्हा नव्याने एक लाख ५० हजार लसमात्रांची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आवश्यक लस उपलब्ध होतील असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Fertilizers Sales: खरिपाचे खुरटलेले खतपाणी

Maharashtra Companies Report: बंद कंपन्यांपैकी ७६ टक्के निष्क्रिय अवस्थेत : मुख्यमंत्री

Malshej Ghat Project: माळशेज घाट-भोरंडे उदंचन प्रकल्पाची शुक्रवारी जनसुनावणी

Koyna Dam Water Release: कोयना धरणातून पुन्हा दरवाजांद्वारे विसर्गास सुरुवात

Pune Weather Update: पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर सरी चालूच

SCROLL FOR NEXT