Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : खानदेशात ‘लम्पी स्किन’ लसीकरण संथ

Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी स्कीन’ रोखण्यासंबंधी लसीकरण सुरू आहे, पण त्याची गती संथ आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ‘लम्पी स्कीन’ रोखण्यासंबंधी लसीकरण सुरू आहे, पण त्याची गती संथ आहे. यातच लशींचा तुटवडादेखील आहे. यंत्रणा कमी मनुष्यबळाचे कारण पुढे रेटून वेळ मारून नेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये लम्पी प्रतिबंधासाठी पशुधनाच्या लसीकरणासाठी मागील महिन्यात लसी प्राप्त झाल्या आहेत. परंतु या लसी फक्त नऊच तालुक्यांत आहेत. त्यात धरणगाव, जळगाव, भडगाव आदी सहा तालुक्यांमध्ये लसी आलेल्या नसल्याची माहिती मिळाली.

जळगाव जिल्ह्यात तीन लाख लशी प्राप्त झाल्या, पण लसीकरण संथ गतीने सुरू आहे. पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या ३५ टक्के जागा रिक्त असल्याने अडचण येत असल्याचा दावा पशुसंवर्धन विभाग करीत आहे. खानदेशात लम्पीसंबंधी प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत साडेचार लाख लसी प्राप्त झाल्या आहेत. परंतु पशुधन या दोन्ही जिल्ह्यांत यापेक्षा अधिक आहे. गायवर्गीय पशुधनाला या लसी दिल्या जात आहेत.

खानदेशात सुमारे नऊ लाख पशुधन गायवर्गीय आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण पशुधन ११ लाख एवढे आहे. त्यात निम्म्यापेक्षा अधिक पशुधन गायवर्गीय आहे. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे सात लाख पशुधन आहे.

या जिल्ह्यांतही दोन लाखांवर पशुधन गायवर्गीय आहे. पशुधनाची संख्या मोठी, पण लसी कमी, अशी स्थिती आहे. यामुळे अडचणी येत आहेत. त्यात लसी कमी आहेत.

अशात खासगी पशुवैद्यक प्रतिबंधात्मक लसी, औषधे देण्याची बतावणी करून लूट करीत आहेत. दूध व्यावसायिक किंवा दूध उत्पादकांना मोठा फटका लम्पी स्कीनमुळे बसला होता. यामुळे दूध उत्पादक खासगी पशुवैद्यकांची मदत घेऊन लसीकरण व इतर औषधांचा पुरवठा करून घेत आहेत. यात खर्च वाढला आहे.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये लम्पी स्कीन रोगाचा विस्फोट खानदेशात झाला होता. सहा हजारांपेक्षा अधिक पशुधनाची हानी काही दिवसांत झाली होती. मागील वर्षातील समस्येचे रौद्र रूप लक्षात घेऊन यंदा उन्हाळ्यात किंवा पावसाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण करण्याची गरज होती, परंतु लसीकरण वेळेत झालेले नाही. लसी उशिरा प्राप्त झाल्याचे कारण शासकीय यंत्रणा पुढे करीत आहेत.

खानदेशात लम्पी स्कीनसंबंधी लागण झालेली नसल्याचा दावा पशुसंवंर्धन विभागाने केला आहे. परंतु या रोगासंबंधी सर्वेक्षण ग्रामीण भागात नियुक्त पशुधन पर्यवेक्षक नियमित करीत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यासंबंधी माहिती वरिष्ठ कार्यालयास देत आहेत, अशीही माहिती मिळाली.

या भागात लसीकरण संथ

जळगाव जिल्ह्यात रोज पाच ते सहा हजार पशुधनाचे लसीकरण केले जात आहे. तुलनेत ही गती संथ आहे. १५ तालुके जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ही गती खासगी पशुवैद्यकांची मदत घेऊन वाढवायला हवी, अशी मागणीदेखील केली जात आहे. धुळ्यातही लसी प्राप्त झाल्या आहेत. सर्व चार तालुक्यांत लसीकरण सुरू नाही.

शिरपूर, शिंदखेडा तालुक्यांतून लम्पी रोगप्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा व लसीकरण संथ असल्याचाच्या तक्रारी आहेत. नंदुरबारातही सहा तालुके आहेत. परंतु सातपुडा पर्वतात कुठेही लसीकरण झालेले नाही. धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यांतून यासंबंधी तक्रारी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: मोदी, शहा हे गद्दार; त्यांनी देश विकला : राहुल गांधी

Heatstroke Cases: उष्माघाताचे राज्यात २१९ रुग्ण

India Growth Rate: भारताचा विकासदर ६.४ टक्क्यांवर

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा

Brazil Ethanol Production: ब्राझीलचा इथेनॉल उत्पादनावर भर

SCROLL FOR NEXT