Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : खानदेशात लसीकरणानंतरही ‘लम्पी’चा विळखा वाढला

Khandesh Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पशुवैद्यकीय विभागाने अनेक भागांत लसीकरण केले. तरीदेखील गोवर्गीय पशुधनात ‘लम्पी’ची समस्या वाढत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पशुवैद्यकीय विभागाने अनेक भागांत लसीकरण केले. तरीदेखील गोवर्गीय पशुधनात ‘लम्पी’ची समस्या वाढत आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात ११० पेक्षा अधिक, तर धुळे व नंदुरबारात मिळून १२५ असे २३५ पेक्षा अधिक पशुधन मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे खानदेशातील स्थिती गंभीर बनत आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासक राज आहे. लोकप्रतिनिधी नाहीत. निवडणुका रखडल्या आहेत. परिणामी, प्रशासन वरचढ झाले आहे. फक्त आकडेवारी, कागद रंगविण्याचे काम ‘लम्पी’बाबत जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग करीत आहे.

शासकीय पर्यवेक्षक, कर्मचारीदेखील शेतकऱ्यांकडून उपचारासंबंधी, औषधांबाबत पैसे लुटत असल्याच्या तक्रारी येत आहेत. जळगाव जिल्ह्यात ५२० बाधित पशुधनांवर उपचार सुरू आहेत. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ७३ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण झाल्यानंतर देखील ज्या गोवर्गीय जनावरांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाधित जनावरांना शासकीय उपचार व सकस आहार देणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

लसीकरण उशिराने झाले. लशी जुलैमध्ये प्राप्त झाल्या. सुमारे तीन लाख लशी आल्या. आता लसीकरण पूर्ण होत आले आहे. पण आजार पसरल्यानंतर, विषाणूने पशुधनग्रस्त झाल्यानंतर लसीकरण सुरू झाले. यामुळे आजारावर प्रतिबंध होऊ शकला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धुळे व नंदुरबारमधील सातपुडालगत, पर्वतीय क्षेत्रात पशुधन बाधित होत आहे. या भागात लसीकरणदेखील अपेक्षितपणे झाले नव्हते. चाळीसगावातून सुरू झालेली ही समस्या जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर, जळगाव, जामनेर, रावेरात पोहोचली. धुळ्यातही गतीने ही समस्या वाढली.

पारोळ्यात वेगाने प्रादुर्भाव

गेल्या महिनाभरात जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात ‘लम्पी’ने डोके वर काढले आहे. १९० जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. महिन्याभरात सांगवी ५, तामसवाडी १, विटनेर १, मंगरूळ १ अशा ठिकाणी आठ जनावरे दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १२५ जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. तर सध्या ‘लम्पी’बाधित ४९ जनावरांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी योगेश देशमुख यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey: खानदेशात वादळग्रस्त नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच

Cotton Farming: सघन लागवड तंत्रासह काटेकोर व्यवस्थापन

Kharif Crop Competition 2026: ‘खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेत सहभागी व्हा’

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरुन सांगलीच्या नागेवाडी, भाग्यनगरमध्ये तणाव, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीसाठी चांदूरबाजार येथे आंदोलन

SCROLL FOR NEXT