Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : अकोला जिल्ह्यातील तीन हजार पशुधनांना प्रादुर्भाव

लम्पी स्कीन आजारासाठी अकोला जिल्हा प्रादुर्भावाचे मध्यवर्ती ठिकाण ठरले असून, उपाययोजना करूनही हा आजार जनावरांमध्ये वाढतच असल्याने चिंतेची परिस्थिती आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः लम्पी स्कीन आजारासाठी (Lumpy Skin Disease) अकोला जिल्हा प्रादुर्भावाचे मध्यवर्ती ठिकाण ठरले असून, उपाययोजना करूनही हा आजार जनावरांमध्ये (Lumpy Infection) वाढतच असल्याने चिंतेची परिस्थिती आहे. जिल्ह्यात प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचा आकडा तीन हजारांपर्यंत पोहोचत आहे. दुसरीकडे लसीकरणही (Lumpy Vaccination) आता एक लाख ८१ हजारांवर जाऊन पोहोचले.

लम्पी स्कीन आजाराने अकोट, तेल्हारा, अकोला या तालुक्यांत सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. अकोट तालुक्यात बोर्डी परिसरातील शिवपूर व इतर गावांत याचा प्रादुर्भाव झालेली जनावरे आढळली होती. तर अकोला तालुक्यात निपाणा, पैलपाडा गावांमध्ये प्रादुर्भाव दिसून आला होता.

निपाणा गावातील जनावराचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर पशुसंवर्धन खात्याची यंत्रणा खडबडून जागी झाली होती. हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचाही वेग वाढवलेला आहे. मात्र प्रादुर्भावसुद्धा दिवसागणिक वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आता प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचा आकडा २,९०० वर जाऊन पोचला. लसीकरणामुळे यातील काही जनावरे बरी झाली. तरीही सध्या दोन हजारांवर जनावरांवर उपचार सुरू आहेत.

पशुपालकांचे नुकसान

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यापासून प्रामुख्याने गायींच्या दूधविक्रीवर परिणाम झालेला आहे. दुधावर कुठलाही परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात असले तरी काही ग्राहक आजही ते मानायला तयार नाहीत.

यामुळे दूध विक्री घटत चालली आहे. पशुसंवर्धन खात्याची यंत्रणा पुरेशी नसल्याने अनेक ठिकाणी खासगी पशुचिकित्सकांकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत. लाखमोलाची जनावरे या आजाराला बळी पडत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT