Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : जिल्ह्यात ‘लम्पी’ चा उद्रेक सुरूच

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा उद्रेक सुरूच आहे. आजपर्यंत ६९७ गायवर्ग जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) उद्रेक सुरूच आहे. आजपर्यंत ६९७ गायवर्ग जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली आहे. लम्पी स्कीनच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत चार लाख ९९८ पशुधनाचे पशुधनाचे लसीकरण (Lumpy Vaccination) पूर्ण झाले आहे. आजपर्यंत २९ जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी (Dr. M.R. Ratnaparkhi) यांनी दिली.

सध्या जिल्ह्यातील ८३ गावे लम्पीबाधित आहेत. या ८३ गावांतील ३६ हजार १५० जनावरांची संख्या आहे. यातील ६९७ बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किलो परिघातील गावांची संख्या ४३३ आहे. एकूण बाधित गावे ५१६ झाली आहेत.

या बाधित ८३ गावांच्या पाच किलो मीटर परिघातील ५१६ गावांतील एक लाख ३८ हजार ९७४ जनावरांची संख्या आहे. या आजारामुळे आजपर्यंत २९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूंची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT