Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Lumpy Vaccination : दिघंची परिसरातील गावांत आतापर्यंत ६ जनावरे दगावली आहेत. १०० जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली असून, त्यांच्यावर जनावरांवर उपचार सुरू आहेत.

Team Agrowon

Sangli News : तालुक्यातील दिघंची परिसरात लम्पी स्कान आजाराने तब्बल १०० जनावरे बाधित झाली आहेत. सहा जनावरे दगावली आहेत. आजार वेगाने पसरत असताना प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. पशुपालक हवालदिल झाले आहेत. दिघंची परिसरात लम्पी स्कीनचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे.

दिघंची परिसरातील गावांत आतापर्यंत ६ जनावरे दगावली आहेत. १०० जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली असून, त्यांच्यावर जनावरांवर उपचार सुरू आहेत. शेतकऱ्यांनी जीवापाड जोपासलेली जनावरे लम्पी स्कीन आजारामुळे मृत्यू पडली. त्याची भरपाई तातडीने प्रशासनाने द्यावी, अशी मागणी आहे. दिघंची भागात पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

दिघंची परिसरातील शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी, दूध उत्पादकांसाठी जनावरे त्यांच्यासाठी एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या जनावरांच्या दुधामधून येणाऱ्या पैशांवर अवलंबून आहे. दिघंची परिसरात लम्पी स्कीनचा प्रसार झपाट्याने वाढत असून, जनावरे दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

दिघंचीत नाही वैद्यकीय अधिकारी

चाळीस लाख रुपये खर्चून बांधलेल्या दिघंची येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांअंतर्गत ११ गावे येतात. दिघंची, शेरेवाडी, आवळाई, पिसेवाडी, पळसखेल, लिंगीवरे, महाडिकवाडी, ठोंबरेवाडी, राजेवाडी, पुजारवाडी, उंबरगाव, विठलापूर अशी गावे आहेत. दिघंची पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्याने लम्पी स्कीन सारख्या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पशुपालक शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

लम्सी स्कीनचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खिलार जनावर विशेषतः खोंडांना आहे. लाखो रुपये किमतीचे खिलार खोंड असून, लम्पी स्कीन आजाराने बाधित आहे.
- ऋतुराज देशमुख, शेतकरी
दिघंची पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत ११ गावे येतात. चार हजार सहाशे जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यात १९ लागण झालेल्या जनावरांपैकी १६ उपचार केले आहेत. तिघांना लागण झाली आहे. त्यातील एक जनावर दगावले आहे, तरी याबाबत शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना येथे संपर्क साधावा.
- डॉ. अविनाश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT