Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्‍पी स्कीन’ने आतापर्यंत १२८० जनावरांचा मृत्यू

Lumpy Skin Disease : कोल्‍हापूर जिल्‍ह्यात आलेल्या ‘लम्पी स्कीन’च्या साथीने आजअखेर गायवर्गीय १ हजार २८० जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्‍हापूर जिल्‍ह्यात आलेल्या ‘लम्पी स्कीन’च्या साथीने आजअखेर गायवर्गीय १ हजार २८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत जनावरांच्या मालकांना आतापर्यंत ३ कोटी ३२ लाखांची नुकसानभरपाई (Compensation) देण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाने तत्‍काळ मदत करून शेतकऱ्यां‍ना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. सध्या तरी लम्‍पीचा प्रादुर्भाव कमी असून, त्यातूनही काही जनावरे दगावल्यास विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

जिल्‍ह्यात लम्‍पी स्कीनने थैमान घातले. हजारोंच्या संख्येने जनावरे बाधित झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तरीही जिल्‍ह्यातील १ हजार २८० जनावरांचा मृत्यू झाला. मृत जनावरांच्या मालकांना शासनाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

यानंतर या मृत जनावरांची माहिती, संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्या‍चा दाखला घेऊन दर पंधरा दिवसांनी नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी पशुसंवर्धन विभागाचा सतत आढावा घेत नुकसान भरपाईबाबत सूचना दिल्या.

पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. वाय. ए. पठाण व जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी तालुक्यातून लम्‍पीने मृत झालेल्या जनावरांची माहिती संकलित केली.

तसेच शासनाकडून अनुदानही प्राप्‍त करून घेत, दर पंधरा दिवसांतून नुकसानभरपाईचे वितरण केले. आजअखेर सर्व लाभार्थींना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.

मृत जनावरांची संख्या- नुकसान भरपाई रक्‍कम

गाई - ७७९- २ कोटी ३३ लाख

बैल - ३१६ - ७८ लाख ७५ हजार

वासरू- १९३ - २० लाख ६६ हजार

एकूण- १२८०- ३ कोटी ३२ लाख ४१ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Water Crisis : अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांत भूजलाची चिंता

Seva Sankalp Abhiyan : बीड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

Krishna River : ‘कृष्णे’वरील उपसाबंदी उठली; दुष्काळी भागास कधी दिलासा?

Watermelon Farming : कलिंगडास प्रतिकूल वातावरणाचा फटका

Woman Farmer Certificate : महिलांना घरी मिळणार ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’

SCROLL FOR NEXT