Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : बैलपोळ्यावर ‘लम्पी स्कीन’चे सावट

लम्पी स्कीन आजाराच्या फैलाव आणि प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार बंद असल्याने बैलपोळ्यावर सावट निर्माण झाले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः लम्पी स्कीन आजाराच्या (Lumpy Skin Outbreak) फैलाव आणि प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार बंद (Livestock Market Closed) असल्याने बैलपोळ्यावर (Bailpola Festival) सावट निर्माण झाले आहे. गोवंशांची वाहतूक (Livestock Transport) आणि विक्री आणि बाजारांवर बंदी असल्याने जिल्ह्यातील आळेफाटा (ता. जुन्नर), चाकण (ता.खेड) याप्रमुख बाजारांसह इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यांतील बाजार बंद आहेत. यामुळे बैलपोळ्याच्या निमित्ताने गाय, बैलांची खरेदी- विक्री बंद असल्याने, बैलपोळ्याच्या सजावटीचा व्यवसायाची बाजारपेठ थंड झाली आहे.

यवत (ता. दौंड) येथे बैलपोळ्याच्या पार्श्‍वभूमीवर परजिल्ह्यांतून येणाऱ्या विक्रेत्यांची या वर्षी चांगलीच निराशा झाली आहे. जिल्ह्यातील विविध बाजार करत हे विक्रेते यवत येथील गुरुवारच्या आठवडे बाजारासाठी आले होते. पदरमोड करून गुजराण सुरू आहे. बैलांचे बाजार लम्पी स्कीनमुळे बंद असल्याने शेतकरी ग्राहक आमच्या पर्यंत पोहोचेनात. त्यामुळे मालाला उठावच नसल्याचे त्यांनी सांगितले.

परजिल्ह्यांतील श्रीरामपूर, शिर्डी, चाळीसगाव, बुलडाणा, सोलापूर, बार्शी अशा विविध भागांतून बैल सजावटीचे साहित्य घेऊन हे विक्रेते जिल्ह्यातील विविध बाजारांना दर वर्षी हजेरी लावतात. या वर्षी मात्र अपेक्षित ग्राहक नसल्याने मालाला खपच नसल्यामुळे हे विक्रेते कमालीचे नाराज आहेत.

यवत येथे येण्यापूर्वी सुपे (ता. बारामती), काष्टी (ता. श्रीगोंदा), पाटस (ता. दौंड), भिगवण (ता. इंदापूर) अशा विविध बाजारांना त्यांनी हजेरी लावली होती. यवतसह या सर्वच बाजारांमध्ये अपेक्षित विक्री झाली नाही, असे हे विक्रेते सांगत आहे. सध्या पदरमोड करून गुजराण सुरू असल्याचे रंगविक्रेते दिलीप व अनिल वाणी (चाळीसगाव), गोंडे, म्होरक्या, गोफ, दोऱ्याचे विक्रेते शिवाजी पेंढारकर (लातूर), उत्तरेश्‍वर नखाते (कुर्डुवाडी), मयूर कासार (श्रीरामपूर) आणि घुंगरू, घंट्या, गोफ, कातडी वाद्यविक्रेते समाधान सुकटे (लोणार, बुलडाणा) हे विक्रेते सांगत होते.

वर्षभर बैल सजावटीचे साहित्य हे लोक तयार करीत असतात. तयार केलेला माल एरवीही जमेल तसा घाऊक किमतीत विकतात. मात्र, बैल पोळ्याच्या हंगामांमध्ये ते गावोगावी आठवडे बाजारात फिरून विकतात.

आठवडे बाजारातील किरकोळ विक्रीमधून चांगला नफा होत असतो. या वर्षी मात्र लम्पी स्कीनचे संकट असल्याने बैलबाजार शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे शेतकरी आमच्या पर्यंत पोहोचेनासा झाला आहे. अनेक ठिकाणी बैलांच्या मिरवणुकांवरही बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बैल सजावटीतला उत्साहही कमी दिसत आहे. त्याचा विपरीत परिणाम व्यवसायावर झाला असल्याचे हे विक्रेते सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT