Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : जतमध्ये लम्पीमुळे बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा भरणार

Lumpy Skin Disease : कोरोना, लम्पी स्कीन या प्रमुख आजारांच्या कारणामुळे जत दुय्यम बाजार आवारात तब्बल पाच वर्षे बंद असलेला जनावरांचा बाजार नवीन वर्षात बाजार समितीने पुन्हा सुरू केला आहे.

Team Agrowon

Sangli News : कोरोना, लम्पी स्कीन या प्रमुख आजारांच्या कारणामुळे जत दुय्यम बाजार आवारात तब्बल पाच वर्षे बंद असलेला जनावरांचा बाजार नवीन वर्षात बाजार समितीने पुन्हा सुरू केला आहे.

शेतकऱ्यांसाठी बाजार पुन्हा सुरू केला असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जत येथील डफळे दुय्यम बाजार आवार येथे अनेक वर्षापासून लहान व मोठ्या जनावरांची विक्री केली जात होती.

दर गुरुवारी भरणाऱ्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत होती. तालुक्यासह लगत असलेल्या तालुके, गावांना मोठा फायदा होत होता या बाजारामुळे शेतकऱ्यांची सोय झाली होती. जनावरांत आलेल्या लम्पी स्कीन आणि कोरोना या आजारांमुळे २०१९ पासून हा बाजार पूर्णपणे बंद होता.

त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. हा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला असून त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बाजार भरविण्यात आला.

सभापती शिंदे म्हणाले, ‘‘कोरोना, ‘लम्पी स्कीन’मुळे गेली पाच वर्षे बाजार बंद होता. शेतकऱ्यांच्या गैरसोयीचा विचार करून बाजार पुन्हा सुरू केला आहे. शेतकऱ्यांना पाण्यासह अन्य सोयीसुविधा निर्माण करण्यात येत आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT