Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी’बाधित जनावरांची उदगीरच्या पथकाकडून तपासणी

Animal care : उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय पथकाने मुखेड, लोहा व कंधार तालुक्यांतील लम्पी बाधित गायवर्गीय पशुधनाची तपासणी केली.

Team Agrowon

Nanded News : उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय पथकाने मुखेड, लोहा व कंधार तालुक्यांतील लम्पी बाधित गायवर्गीय पशुधनाची तपासणी केली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ भारकड, डॉ. रवींद्र सूर्यवंशी यांच्यासह नांदेड जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ, प्रवीणकुमार घुले उपस्थित होते.

जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांना लम्पी स्कीन या आजाराचा विळखा वाढला आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण जिल्हा लम्पी बाधित घोषित केला आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागाही या आजाराच्या नियंत्रणासाठी युद्धस्तरावर काम करीत आहे. यासाठी जिल्हा बाहेरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे.

बुधवारी (ता. ३०) उदगीर (जि. लातूर) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने मुखेड, लोहा व कंधार तालुक्यांतील लम्पी बाधित गायवर्गीय पशुधनाची तपासणी केली. या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ भारकड, डॉ. रवींद्र सूर्यवंशी यांच्यासह नांदेड जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ, प्रवीणकुमार घुले उपस्थित होते.

लोहा तालुक्यातील घुगेवाडी, वागदारवादी, दगडसंगवी येथे भेट देऊन रक्तजल नमुने, बाह्य कीटक, गोचीड आदी नमुने तपासणीसाठी गोळा केले. कंधार तालुक्यातील बामणी व पाणशेवडी, मुखेड तालुक्यातील कृष्णावाडी येथे देखील पथकाने भेट देऊन पशुपालकांनी सूचनेचे पालन करावे, असे मार्गदर्शन केले आहे.

जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण शंभर टक्के झाले आहे. बाधित व निरोगी जनावरे एकत्रित न ठेवता विलगीकरण करावे, चरण्यासाठी एकत्रित सोडू नका, सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण करून घ्या, गोठे स्वच्छ ठेवा, निर्जंतुकीकरण करून घ्यावे अशा सूचना पथकाने दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT