Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : फिरत्या पशुचिकित्‍सालयाद्वारे दररोज २ हजार पशुधनाची तपासणी

जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगरी आदिवासी भागांसह सर्व गावांतील पशुधनाची फिरत्या पशुचिकित्सालयाद्वारे तपासणी केली जाणार आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगरी आदिवासी भागांसह सर्व गावांतील पशुधनाची (Livestock) फिरत्या पशुचिकित्सालयाद्वारे (Mobile Veterinary Clinic) तपासणी केली जाणार आहे. यासाठी नव्याने ३० फिरत्या पशुचिकित्सालयाची खरेदी केली जाणार असून, नव्याने दाखल होणाऱ्या पशुचिकित्सालयाची संख्या आता ७५ होणार आहे. या पशुचिकित्सालयाद्वारे दररोज सुमारे २ हजार पशुधनाची तपासणी (Inspection Of Livestock) आणि उपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रत्येक पशुधनाची तपासणी आणि उपचार देण्याची मोहीम आखण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक पशुधनास उपचार मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. यासाठी फिरत्या चिकित्सालयाचे खरेदी करण्यात आली आहे. नव्याने ३० पशुचकित्सालयची खरेदी प्रस्तावित असून, नव्याने ही पशुचिकित्सालये दाखल झाल्यावर पशुरोगचिकित्सा तपासणीला वेग येणार आहे.’’

प्रत्येक पशुधनाला उपचार मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींसोबत समन्वय साधण्यात आला असून, पशुपालकांच्या एकत्रित मागणीनुसार त्या गावामध्ये पशुचिकित्सालये दाखल होणार आहेत. यासाठी पशुपालकांनी त्यांची आजारी पशुधन एकाच ठिकाणी आणल्यास तपासणी आणि उपचार करणे सोपे होणार आहे. यासाठी माहिती फलक आणि प्रचार करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत,’’ असेही विधाटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरुन सांगलीच्या नागेवाडी, भाग्यनगरमध्ये तणाव, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीसाठी चांदूरबाजार येथे आंदोलन

Rahuri Farmers Protest: कांदादर, संपूर्ण कर्जमाफीसाठी राहुरीत ‘रास्ता रोको’

Banana Farmers Demand: तक्रार नोंदवू न शकलेल्या केळी उत्पादकांनाही मदतीची मागणी

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

SCROLL FOR NEXT