Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : पुणे जिल्ह्यात राबविणार गायी, म्हशीमधील वंधत्व निवारण मोहीम

Cow Infertility : गेल्या काही महिन्यांपासून जनावरांमध्ये वंध्यत्वाची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे जनावरांमध्ये जनावरे भाकड राहण्याचे प्रमाण वाढत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या काही महिन्यांपासून जनावरांमध्ये वंध्यत्वाची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे जनावरांमध्ये जनावरे भाकड राहण्याचे प्रमाण वाढत आहे. हे कमी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत येत्या ३० डिसेंबरपासून गायी व म्हशींतील वंधत्व निवारण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील वंधत्व असलेल्या गायी-म्हशींचे सर्वेक्षण २० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये वंध्यत्वाची लक्षणे वाढत असल्याचे दिसून आले आहे. पशुपालकांसाठी हे अडचणीचे आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. प्रामुख्याने वंध्यत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे.

सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व म्हशीच्या पारड्या २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवतात. जनावरांमध्ये सलग तीन आठवडे वजनात घट दिसून आल्यास त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंध्यत्वाची बाधा आढळते.

त्यामुळे जनावरांना रोज एक किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायाम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी आवश्यक आहे. त्याची माहिती पशुपालकांना देण्यासाठी प्रत्येक गावात पशुसंवर्धन विभागामार्फत वंध्यत्वनिवारण शिबिर घेण्यात येणार आहे. तपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात.

गायी-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतांतील काळ कमी होण्यास मदत होते. गायी- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्य वेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे यावर उपाययोजनेसाठी पशुपालकांनी अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे .

विभागामार्फत या संदर्भात प्रसिद्धी व प्रचार सुरू करण्यात आलेला आहे. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाय-म्हशींमध्ये उद्‍भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी मोहिमेला सुरुवात ३० डिसेंबरपासून होत आहे. या मोहिमेत गावागावांत वांझ गाय-म्हशींची तपासणी व उपचार तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचा पुणे जिल्ह्यातील पशुपालकांनी फायदा घ्यावा व आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा.
- रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Management: संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे : मित्तल

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

Chhatrapati Sambhajinagar DPDC Meeting: ‘डीपीडीसी’ बैठकीत ९०९ कोटींचा आराखडा मंजूर

Vidarbha Farmer Issues: सिंचनाच्या अभावामुळेच शेतकरी आत्महत्या

Fake Fertilizers Seeds Issue: बोगस बियाणे, खत काळाबाजार प्रकरणांत थेट गुन्हे दाखल करा : विखे पाटील

SCROLL FOR NEXT