Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात लम्पीने एकाच दिवसात नऊ जनावरांचा मृत्‍यू

आतापर्यंत ८१ गावांतील १,०५६ जनावरांना प्रादुर्भाव

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये पशुधनांना (Livestock) लम्पी स्कीनच्या आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात नऊ जनावरांचा मृत्यू झाला असून, आजअखेर ६२ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ८१ गावांमधील ९३४ गाई व १२२ बैल अशी एकूण एक हजार ५६ जनावरांना प्रादुर्भाव झाला असून ९९ जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत.

जिल्ह्यात दोन लाख १५ हजार ६५८ जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील ८१ गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.

सद्य:स्थितीत ९०४ जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ८१ हजार ९०० लसी उपलब्ध असून आजअखेर दोन लाख १५ हजार ६५८ पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पी स्कीन आजाराच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका पशुचिकित्सालयात उपलब्ध आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी पशुवैद्यकीय सेवादात्यांमार्फत लम्‍पी स्कीन आजाराचे लसीकरण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने लसीकरणाने वेग घेतला असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT