Moringa Fodder  Agrowon
काळजी पशुधनाची

Moringa Fodder : चारा म्हणून वापरा शेवग्याची पाने

Animal Fodder : शेवग्याचा पानांचा उपयोग चारा म्हणून केल्यास चारा टंचाईच्या काळात शेवगा हे पीक फायदेशिर ठरु शकते. शेवग्यामध्ये टॅनिन, ट्रीप्सीन आणि अमायलेज या घटकांचे प्रमाण अतिशय कमी असते.

Team Agrowon

Animal Care : शेवग्याचा पानांचा उपयोग चारा म्हणून केल्यास चारा टंचाईच्या काळात शेवगा हे पीक फायदेशिर ठरु शकते. शेवग्यामध्ये टॅनिन, ट्रीप्सीन आणि अमायलेज या घटकांचे प्रमाण अतिशय कमी असते. तर पानांमध्ये २१.८ टक्के प्रथिने, २२.८ टक्के तंतूमय पदार्थ, ४.१२ टक्के स्निग्ध पदार्थ, २१.१२ टक्के कार्बोदके असतात. 

महाराष्ट्रात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे बऱ्याचशा जमिनी हलक्या आणि नापिक म्हणून पडून आहेत. शेवगा पीक पावसाच्या पाण्यावर येणारे असल्यामुळे अशा जमिनीत शेवग्याची व्यापारी तत्त्वावर  लागवड करता येते.

फायदे काय आहेत?

मेंढ्याच्या आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश केल्यास मेंढ्यांच्या वजनामध्ये वाढ, दुध उत्पादनात वाढ आणि शेळ्यांच्या पचनशक्तीमध्ये सुधारणा आढळून आलेली आहे. शेवग्याची पाने वाळवूनही जनावरांना खाऊ घालता येतात. 

शेवग्याच्या पानांची कापणी

शेवग्याच्या पानांची कापणी झाडाची उंची १.५ ते २ मीटर म्हणजेच लागवडीनंतर ६० ते ९० दिवस झाल्यानंतर करावी. कापणी करताना जमिनीपासून २० ते ४५ सेंमी उंचीवर करावी. त्यामुळे नविन अंकूर फुटण्यास वाव मिळतो. त्यानंतरची कापणी ३५ ते ४० दिवसांनी करावी. चाऱ्यासाठी शेवग्याची कापणी करायची असल्यास ७५ दिवसानंतर करावी.

अंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड केली असल्यास २ ते ४ महिन्याच्या अंतराने कापणी करावी. अशावेळी कापणी करताना दुसऱ्या आंतरपीकावर शेवगा झाडाच्या सावलीचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. 

--------------------------

स्त्रोत - पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT