Lumpy Skin Disease Management Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : लंपी स्किन आजाराला कसं रोखाल ?

गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकडे अनेक पशुपालक दुर्लक्ष करत आहेत.

Team Agrowon

जनावरांतील लंपी स्किन (Lumpy Skin Disease) आजार महाराष्ट्रातही हात पाय पसरु लागलाय. गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकडे अनेक पशुपालक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनावरांतील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत या आजारामुळे राज्यात २२ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काळात याकडे दुर्लक्ष केल्यास यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या आजारावर लंपी प्रो व्हॅक ही प्रतिबंधात्मक लस विकसीत झाली असली तरी त्या लसीचे ट्रायल सुरु असल्यामुळे ती सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे शेळय़ांमध्ये देवी रोगावर वापरण्यात येणारी लस वापरून हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आजाराची लक्षणे काय आहेत ?

या आजारामध्ये प्रथम जनावराला मध्यम स्वरूपाचा तर काही वेळेस भयंकर असा ताप येतो. जनावरांच्या डोळय़ातून आणि नाकातून पाणी येते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते. लसिका ग्रंथीना सूज येते, जनावरांच्या शरीरावर अंदाजे दोन ते पाच से.मी. व्यासाच्या कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. रक्तातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी होते.

उपचार काय आहेत?

आजार येऊ नये म्हणून आणि या आजाराच्या नियंत्रणासाठी प्राथमिक उपचार काय करायचे या विषयी माहिती देत आहेत नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ संस्थेचे संचालक, विस्तार शिक्षण प्रा. डॉ. अनिल भिकाने

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT