Diet of Milky Animals Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : दुभत्या जनावरांचा आहार कसा असावा?

विलेल्या जनावराला इतर जनावरापासून वेगळे ठेऊन त्याच्या आहार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे.

Team Agrowon

दुभत्या जनावरांचे आहार नियोजन (Diet Planning) व्यवस्थितपणे झाल्यास जनावरांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) चांगली राहते. आहारात क्षारमिश्रणे, जीवनसत्वे, हिरवा चारा (Green Fodder) सुका चारा आणि खुराकाचा वापर समतोल प्रमाणात केल्यामुळे जनावर आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. विलेल्या जनावराला इतर जनावरापासून वेगळे ठेऊन त्याच्या आहार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे. आहारामध्ये कोणकोणत्या खाद्याचा समावेश करावा या विषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या पुढील वेळापत्रकाचा अवलंब करावा.

जनावर विल्यानंतर पाचव्या दिवसापासुन घुग-या ऐवजी दिड किलो खुराक शरीर पोषणासाठी द्यावा.
- उत्पादित दुधाच्या ४० टक्के प्रमाणात जास्तीचा खुराक थेाडा थोडा वाढवत नेऊन ८ – १० दिवसांत पुर्ण संतुलित आहार दयावा.
- गाय रोज १० लिटर दुध देत असेल तर ४ किलो जास्तीचा खुराक दयावा. अशा प्रकारे गाईला १.५ किलो अधिक ४ किलो असा एकुण ५.५ किलो खुराक, निम्‍मा – निम्‍मा करुन सकाळ-संध्याकाळ दयावा.
- हिरवा चारा किंवा मुरघास १० – १५ किलो व खाईल तितका कडबा दयावा.
- दुभत्या म्हशीला पोषणासाठी रोज २ किलो खुराक दयावा. दुध उत्पादनाच्या ५० टक्के जास्तीचा खुराक दयावा. म्हणजे १० लिटर दुध देणा-या म्हशीस ५ किलो जास्तीचा खुराक दयावा. अशा प्रकारे २ + ५ = ७ किलो खुराक रोज सकाळ–संध्याकाळ निम्‍मा भाग दयावा.
- हिरवा चारा व सुकी वैरण गाई प्रमाणे दयावी. सहा लिटर दुध देणा-या म्हशीस १५ किलो डाळवर्गीय चारा जसे लुसर्न गवत, बरसीम, दशरथ, हादगा, शेवरी इ. अधिक १५ किलो कडुळ किंवा मक्याचा हिरवा चारा आणि खाईल तितका कडबा दिल्यास खुराक देण्याची आवश्यकता लागत नाही.
- सहा किलो पेक्षा जास्त दुध देणा-या जनावरास हिरवा चारा असला तरीही जास्तीचा खुराक देणे आवश्यक आहे. एक किलो खुराकाऐवजी ४ किलो डाळवर्गीय हिरवा चारा दयावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT