seasonal breeding management in Buffalo 
काळजी पशुधनाची

Animal Care : गाय, म्हशीतील प्रजनन व्यवस्थापन कसे ठेवाल?

दुग्ध व्यवसायातील अर्थशास्त्राचा गाय, म्हशीच्या प्रजननाशी जवळचा संबंध आहे. आपल्या गोठ्यातील प्रजननक्षम गाई, म्हशींच्या प्रजननाचे वेळापत्रक बनवावे.

Team Agrowon

दुग्ध व्यवसायातील अर्थशास्त्राचा गाय, (Cow) म्हशीच्या (Buffalo) प्रजननाशी जवळचा संबंध आहे. आपल्या गोठ्यातील प्रजननक्षम गाई, म्हशींच्या प्रजननाचे वेळापत्रक बनवावे. त्यानूसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने नियोजन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गाय, म्हैस गाभण न राहण्याच्या कारणांची दिलेली माहिती पाहूया.


काही शेतकरी गाय - म्हैस कृत्रिम रेतनानंतर पुन्हा माजावर आलेली नाही म्हणजे ती गाभण आहे असे समजतात. परंतु सात ते आठ महिन्यांनी जेव्हा गाय - म्हैस कास करीत नाही तेव्हा चूक लक्षात येते. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झालेले असते. त्यामुळे भरवलेली प्रत्येक गाय शेवटच्या कृत्रिम रेतनानंतर ६० दिवसात आणि म्हैस ९० दिवसात गाभण राहिली आहे का? याची पशुवैद्यकाकडून खात्री करून घ्यावी. कारण गाय म्हैस आटविण्यासाठी तसेच गाभण काळाच्या शेवटच्या तीन महिन्यात जास्त खुराक देण्यासाठी नियोजन करण्यास मदत होते.

गाय, म्हैस गाभण न राहण्याची कारणे?


- गाय, म्हैस गाभण असतानाच माजावर येत नाही असे नाही. माजावर येण्यासाठी लागणाऱ्या संप्रेरकांचे संतुलन बिघडणे, वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढणे इत्यादी कारणांमुळे गाई म्हशी गाभण राहत नाहीत.
- या उलट काही गाई, म्हशी गाभण असताना सुद्धा नियमित माजावर येतात. अशा वेळेस त्या निश्चित गाभण आहेत का याची खात्री करावी.
- जनावरांतील कृत्रिम रेतनाने अथवा नैसर्गिक पैदाशीने गाभण करवून घेतलेली तारीख पशुपालकाने नोंद करून ठेवावी. दोन ते अडीच महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून ती तपासून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी.
- गाभण असल्यास रेतनाच्या तारखेवरून ती सर्वसाधारणपणे कोणत्या तारखेला विणार हे निश्‍चित करता येते.
- जनावरे विण्याची तारीख नोंदवणे आवश्यक आहे. गायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस (२८० दिवस) तर म्हशीतील १० महिने १० दिवस (३१० दिवस) असतो. त्यानूसार जनावरांच्या प्रजननाचे व्यवस्थापन ठेवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT