Animal Diet  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed Management : आहारातील थोडासा बदल उन्हाळ्यातही टिकवून ठेवेल गाय, म्हशीचं दूध

Animal Care : उन्हाळ्यात जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन चाऱ्याची गरज भागविली जाते. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल केला जातो. त्यामुळे जनावरांचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते.

Team Agrowon

Animal Feed : उन्हाळ्यात जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन चाऱ्याची  गरज भागविली जाते.  हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल केला जातो. त्यामुळे जनावरांचे रवंथ  करण्याचे प्रमाण कमी होते.  रवंथ कमी झाल्याने जनावरांना अपचनासारखे आजार होतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन, दूध उत्पादनात घट दिसून येते.

उन्हाळ्यात जनावरांवर जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचाच ताण असतो. त्यामुळे जनावराची प्रजननाची क्रिया मंदावते. परिणामी या काळात जनावरे माजावर येण्याचे प्रमाणही कमी होतं. अशा परिस्थीतीत जनावराला शरीर क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जायुक्त आहार दिल्यास असा आहार शरीर वाढीसाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी वापरला जातो. मग जनावरांना कोणता उर्जायुक्त आहार पुरवायचा? तर

जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण उत्तम राहण्यासाठी वारंवार थोडा-थोडा चारा खाण्यास द्यावा.

उच्च प्रतीच्या चारापिकांचा त्यांच्या आहारात समावेश करावा. आहारात सर्व घटक योग्य प्रमाणात आहेत का? हे पहावे. चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषणतत्वांची घनता वाढवावी. आहारातील पोषणतत्वांची घनता वाढल्यामुळे  कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषणतत्त्वे उपलब्ध होतील. जनावरांना दिवसाच्या थंड वेळी चारा खाण्यास द्यावा. चारा शक्यतो कुट्टी करूनच द्यावा. जनावरांच्या आहारात फक्त वाळलेला चारा न वापरता हिरवा आणि वाळलेला अशा दोन्ही प्रकारचा चारा मिसळून द्यावा.    

उन्हाळ्यात आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमी ठेवून पशुखाद्य किंवा खुराक वाढवून देणे हा सर्वसाधारण पर्याय आहे. यामुळे आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाणात वाढ होईल. मात्र कधी कधी असे केल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण घटण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारातील ऊर्जेची घनता वाढवण्यासाठी स्निग्ध पदार्थाचा किंवा बायपास फॅटचा वापर करावा. असा बदल केल्यामुळे १ ते १.५ लिटरपर्यंत दूध उत्पादन वाढल्याचे दिसून येते. याशिवाय जनावरांच्या शरीरावरील उष्णतेचा ताणही कमी होण्यास मदत होते.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात स्निग्ध पदार्थाचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवतात. यामध्ये तंतुमय  पदार्थांची पचनक्रिया कमी होणे, कोटीपोटातील जीवजंतूना विषबाधा होणे, पचलेले अन्न शोषण्यात अडथळा येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून बायपास फॅटचा वापर अतिशय उपयोगी पडतो. 

जनावरांच्या आहारात ५-७ टक्क्यांपेक्षा जास्त तेलबियाच्या पेंडीचा म्हणजेच फॅटयुक्त पदार्थाचा  वापर करू नये. जनावरांना ३० ते ४० टक्यांपेक्षा जास्त आहारातील फॅट हे तेलबियामधून देवू नये, तसेच ४० ते ४५ टक्यांपर्यंत फॅटची पूर्तता ही धान्य व इतर घटकातून पूर्ण करावी. त्याबरोबरच १५ ते ३० टक्के फॅटची गरज बायपास फॅटचा वापर आहारात करून पूर्ण करावी. जनावराच्या आहारात अशा प्रकारे बदल केल्यास उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचे  जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम टाळता येतात आणि दूधही टिकून राहतं. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT