Lumpy skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीनग्रस्त जनावरांना ‘माणुसकी’चा हात

इचलकरंजी शहरात माणुसकी फाउंडेशनने राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे छावणी उभारून बारा दिवसांपासून लम्पी स्कीनग्रस्त जनावरांवर मोफत औषधोपचार सुरू केले आहेत.

टीम ॲग्रोवन

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : इचलकरंजी शहरात माणुसकी फाउंडेशनने (Manuski Foundation) राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे छावणी उभारून बारा दिवसांपासून लम्पी स्कीनग्रस्त (Lumpy Skin Disease) जनावरांवर मोफत औषधोपचार सुरू केले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यभरात लम्पी स्कीनच्या आजाराची अनेक जनावरांना लागण झाली आहे.

प्रशासनाच्या वतीने तसेच विविध सामाजिक, सेवाभावी संघटनांच्या वतीने अशा जनवरांसाठी लस आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. माणुसकी फाउंडेशनदेखील या मुक्या जनावरांसाठी धावले आहे. शहरात मोकाट जनावरांची संख्या लक्षणीय आहे.

या जनावरांनाही लम्पी स्कीनची लागण झाली असून तोंडाला फेस येऊन रस्त्यावर पडणे, तापामुळे सुन्न होऊन पडत आहेत. अशा जनावरांना ‘माणुसकी’ने शक्यती सर्व मदत करण्याचा निर्णय घेतला, असे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे यांनी सांगितले. मागील बारा दिवसांपासून इचलकरंजी शहरातील लम्पी स्कीनग्रस्त जनावरांना राजीव गांधी सांस्कृतिक भवन प्रांगणात २४ तास मोफत औषधोपचार सुरू आहेत.

यामध्ये विष्णू गो शाळा, शिवराणा बहुउद्देशीय संस्था, अॅनिमल केअर अशा काही संस्थांच्या माध्यमातून औषधोपचार सुरू आहेत. आयुर्वेदिक पौष्टिक लाडू लम्पी स्कीन संसर्गित जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढून लम्पी स्कीनपासून मुक्त व्हावीत

यासाठी शिवराणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक पौष्टिक लाडू व होमिओपॅथिक औषधांचा पुरवठा केला जात आहे. ही औषधे मोफत असल्याने याचा लाभ गोपालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT