Goshala Subsidy Agrowon
काळजी पशुधनाची

Goshala Subsidy : राजस्थानात गोशाळांना चार वर्षांत मिळाले २ हजार कोटींचे अनुदान ; मुख्यमंत्री गेहलोत यांचा दावा

Goshala Subsidy Rajsthan : गेल्या चार वर्षांत राजस्थान सरकारने राज्यातील गोशाळांना सुमारे दोन हजार ३१३ कोटी रुपये अनुदान दिले आहे. यामुळे तेथील गोशाळा आणि गायींचे संवर्धन होण्यास मदत होत आहे.

Team Agrowon

Ashok Gehlot : गेल्या चार वर्षांत राजस्थान सरकारने राज्यातील गोशाळांना सुमारे दोन हजार ३१३ कोटी रुपये अनुदान दिले आहे. यामुळे तेथील गोशाळा आणि गायींचे संवर्धन होण्यास मदत होत आहे.

मागील भाजप सरकारने दिलेल्या अनुदानापेक्षा जास्त अनुदान सध्याच्या काँग्रेस सरकारने दिल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. उदयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गेहलोत यांनी यावेळी दूध दिनानिमित्त पशुपालकांशीही संवाद साधला.

मागील भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात गोशाळांसाठी केवळ १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या तुलनेत सध्याच्या काँग्रेस सरकारने राज्यातील गोशाळांसाठी गेल्या चार वर्षांत दोन हजार ३१३ कोटी रुपये अनुदानाच्या स्वरूपात दिल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.

दूध अनुदान

गेहलोत म्हणाले की, आमच्या सरकारने दूध उत्पादकांच्या पाठीशी राहत त्यांनी अनुदान देत आहे. दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले जात आहे. दुधासाठी आत्तापर्यंत एक हजार ११० कोटी रुपये अनुदान दिले आहे.

ज्यामुळे पशुपालकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारत आहे. तसेच गोशाळांना नऊ महिने अनुदान दिले जात आहे. तसेच राज्यात मुख्यमंत्री बाल गोपाल योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दूध देण्याच्या योजनेची घोषणाही करण्यात आली आहे.

प्रत्येक पंचायत समितीमध्ये नंदीशाला

पशुपालन क्षेत्राच्या विकासासाठी राजस्थान सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये नंदीशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या नंतर ग्रामपंचायत पातळीवरही सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय राज्यात पाच हजार डेअरी बूथ सुरू केले जाणार असून या माध्यमातून बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही गोशाळांना १५ ते २५ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवंश हत्याबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राज्यस्तरीय गोसंवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना रद्द करून नवी सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गोशाळांना गायींच्या संख्येवर आधारित अनुदान देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार

Maize Ethanol Project: महाराष्ट्रात उभारणार मका पीक आधारित नवा इथेनॉल प्रकल्प, राज्य सरकारकडून ११५ कोटी निधीला मुंजरी

Cotton Farming Guidance: कोंढवड येथे कापूस उत्पादकांना शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT