Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेळ्यांची निवड कशी कराल?

शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात.

Team Agrowon

शेळीची निवड (Goat Selection) करताना आपला मूळ हेतू कोणता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. मांस उत्पादनासाठी शेळीपालन (Goat Farming) करायचे असेल तर जन्मतः जास्त वजनाची करडे देणारी, एका वेतात अधिक करडे देणारी, झटपट वजन वाढणाऱ्या मादी व नराची निवड करावी. दुधासाठी पैदास करायची असल्यास दूध देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी.संगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेळ्याची निवड करताना काय काळजी घ्यावी या विषयी पुढील माहिती दिली आहे.

- शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली शेळी विकत घेणे चांगले असते.

- जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.

- दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी. चपळ असावी.

- शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे. म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी.

- शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा, हेही महत्त्वाचे लक्षण आहे.

- केस मऊ व चमकदार असावेत. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.

शक्‍यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. चरताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो.

- शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह रोग नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात.

- निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजिवी कीटकांपासून मुक्त असावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT