Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : सांगलीत जनावरांचे सार्वत्रिक लसीकरण

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यात युद्धपातळीवर जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली : लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यात युद्धपातळीवर जनावरांना लसीकरण (Lumpy Skin Vaccination) करण्यात येत आहे. सध्या ६७ हजार १६१ जनावरांना लस (Lumpy Skin Vaccine) देण्यात आली आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय दवाखाना असणाऱ्या गावांत आणि त्यांच्या परिसरातील जनावरांचे अधिकाऱ्यांकडून लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ११८ जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच तीन जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. ४५ जनावरे उपचारातून बरी झाली आहेत. लम्पी स्कीनला थोपवण्यासाठी विविध दूध संघ आणि प्रशासनाकडून जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या जनावरांची संख्या ४८ हजारांवरून बुधवारी (ता. २१) ६७ हजार १६१ वर पोहोचली. मंगळवारी (ता. २०) एकाच दिवसात १९ हजार १६१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाकडे ३४ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. तसेच ५० हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. या अगोदर जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेल्या गावांच्या जवळपासच्या गावांत जनावरांचे लसीकरण करण्यात येत होते; मात्र, शासनाकडून आलेल्या आदेशानुसार आता पशुवैद्यकीय दवाखाना असणाऱ्या गावांत आणि त्याच्या आसपासच्या सर्व गावांतील जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे ४ लाख गाई आणि बैल आहेत. त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे.

गावात असणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीकरण करण्यात मदत करण्यासाठी ३११ खासगी सेवा दाते यांना सेवा तत्त्वावर नेमण्यात आले आहे, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे काही दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण जनावरांचे लसीकरण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT