Production Technology For Fodder Maize Agrowon
काळजी पशुधनाची

जनावरांना मक्याचा चारा कशासाठी ?

मका हे तिन्ही हंगामात येणारे पिक असून हिरव्या चाऱ्यासाठी बहुसंख्य पशुपालक उन्हाळ्यात मक्याचा वापर हिरवा चारा म्हणून करतात.

Roshani Gole

मका (maize) हे तिन्ही हंगामात येणारे पिक असून हिरव्या चाऱ्यासाठी (green fodder) बहुसंख्य पशुपालक उन्हाळ्यात मक्याचा वापर हिरवा चारा म्हणून करतात. मक्याचा वापर आपण हिरवा चारा म्हणून करू शकतोच सोबतच अतिरिक्त हिरव्या चाऱ्याचा मुरघास (silage) बनवूनही ठेवू शकतो.

जमिनीची पूर्वमशागत-
मक्याच्या पिकासाठी चांगली काळी-कसदार, मध्यम ते भारी जमीन उपलब्ध असल्यास उत्पादन चांगले मिळते. एक खोल नांगरणी आणि कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

पेरणी-
पेरणी करण्यासाठी हेक्टरी ७५ किलो बियाण्यांची गरज पडते. दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटर ठेवावे. पेरणीपूर्वी बियाणाला अॅझोटोबॅक्टरची बीजप्रक्रिया करावी. २५० ग्रॅम जीवाणूसंवर्धकाचा वापर दहा किलो बियाण्यांसाठी करावा. बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी शेतात शेणखत टाकावे. पेरणी करताना १०० किलो नत्र, ५० किलो पालाश आणि ५० किलो स्फुरदची मात्रा द्यावी.

चाऱ्यासाठी मक्याच्या जाती- मक्याचा चारा पिक म्हणून वापर करीत असताना आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जातींची निवड करावी.


पिक वाढीच्या अवस्थेत सुरुवातीच्या काळात एक कोळपणी आणि खुरपणी करून घ्यावी. पिकाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी वातावरणानुसार सात ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापणी साधारणपणे ५० टक्के फुलोऱ्यात असताना करावी. या अवस्थेत कापणी केल्याने पौष्टिक चारा जनावरांना खायला मिळतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो.


मक्याचा चारा अत्यंत सकस आणि रुचकर असतो. हा चारा जनावरांना दिल्यास दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT