Animal Dehydration
Animal Dehydration Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Dehydration : जनावरांनाही डिहायड्रेशन होतं का?

Team Agrowon

वातावरणातील तापमान वाढल्यास जनावरांच्या शरीराचेही तापमान आणि वातावरणातील तापमान यामध्ये फरक पडतो. बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी जनावराच्या शरीरातून घाम स्त्रवत असतो.

मात्र जनावरांना शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी ठराविक प्रमाणात पाणी आवश्यक असतं. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे जनावराची पाण्याची  गरज वाढते.  मात्र पाण्याच्या  कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही.

जर कमी प्रमाणात पाणी घेतले किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ते गमावले तर त्याचा परिणाम डिहायड्रेशनमधे (Dehydration) होतो.जनावराच्या लघवी, मल, घाम; तसच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असतं. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते.

शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; मात्र  हे प्रमाण वाढले, तर 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो.

'डिहायड्रेशन'मुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड यांच्या पातळीत असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

जनावराला डिहायड्रेशन झाल्यानंतर  त्वचेची लवचिकता कमी होते. सतत आळस येणे, त्वचा घट्ट होणे , वजन कमी होणे आणि श्लेष्मल त्वचा आणि डोळे कोरडे होतात. त्वचा निस्तेज होते, नेत्रगोलक खोलवर जातात.

असामान्य लाळ येणं अशी लक्षणे दिसून येतात. निर्जलीकरणामुळे जनावर अचानक खाली पडू शकते.

जनावरांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यामध्ये उपलब्ध करून द्यावं.

मुक्त संचार गोठ्यातील पाणी थंड राहावं यासाठी पाण्याच्या टाक्या सिंमेटच्या असाव्यात.शक्य असल्यास त्या पाण्यात मीठ, साखर किंवा गूळ टाकावा.

जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावा. कारण चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते. तसेच दुपारच्या वेळेस जनावरांना शेतात चरण्यासाठी पाठवू नये.

ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षारांचे प्रमाण द्यावं. याशिवाय जनावरांना पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्यावी.

जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावे.गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्‍यक आहे.

एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास,उष्णतेचे निस्सारण होण्यास जास्त वेळ लागतो.त्यामुळे जनावरांना जास्त उष्णता जाणवते. गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी गोठ्यामध्ये जागा असावी.

त्यामुळे जनावरांना श्वसनाचा त्रास होणार नाही. गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा. त्यामुळे उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांतील उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो. गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावे, त्यावर पाणी शिंपडावे. असे केल्याने छताचे तापमान जास्त वाढत नाही आणि गोठा थंड राहतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT