Animal Care : जनावरांच्या शरीर क्रियेत पाणी महत्वाचे का आहे?

Team Agrowon

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये त्यांच्या ओटीपोटातील उपयोगी जिवाणूंसाठी चांगल्या वातावरणाची निर्मिती पाणी करते.

Animal Care | Agrowon

पाणी हे शरीरातील महत्त्वाचे द्रवरूपी माध्यम आहे. ज्यामुळे पेशीतील आणि पेशी बाहेरील रासायनिक क्रिया सहज शक्य होतात.

Animal Care | Agrowon

शारीरिक तापमानाचे नियमन करण्यासाठी देखील पाण्याची आवश्यकता असते. कारण पाण्याचा उष्मांक जास्त असल्यामुळे ते जास्त उष्णता ग्रहण करून कमीत कमी शारीरिक तापमान वाढ होते.

Animal Care | Agrowon

पाण्याची उष्णता वहन क्षमता जास्त असल्यामुळे ऊर्जा स्रोतापासून उष्णता लवकर संपूर्ण शरीरभर पसरविण्यास पाणी मदत करते.

Animal Care | Agrowon

महत्त्वाचे म्हणजे पाणी मलमूत्र रूपात किंवा घामाच्या रूपात आंतरिक ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी मदत करते.

Animal Care | Agrowon

शरीरातील द्रवामधील हायड्रोजन आयनचे प्रमाण अर्थात पोषक आम्ल अंश किंवा अल्कली अंश सुयोग्य राखते.

उन्हाळ्यात जनावरे पाणी पिताना | agrowon