जनावराला दिल्या जाणाऱ्या अाहारावर दुधातील घटकांचे प्रमाण अवलंबून असते. 
काळजी पशुधनाची

दुधातील जंतु अपायकारक असतात का?

दूध मानवी आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. दुधात असलेले अनेक पोषक घटक हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वाच्याच वाढीसाठी गरजेचे असतात. दुधातील बॅक्टेरियाची संख्या मर्यादेच्या पुढे गेल्यास असे दूध मानवी आरोग्यास अपायकारक असते.

Roshani Gole

दूध मानवी आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. दुधात असलेले अनेक पोषक घटक हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वाच्याच वाढीसाठी गरजेचे असतात. तथापि आपल्याकडील उष्ण हवामानाचा विचार करता दुधात सुक्ष्म जीवाणूंची वाढ झपाट्याने होत असते. दुधातील सुक्ष्मजीवाणूंची संख्या एका मर्यादेच्या पलीकडे गेल्यास हे दूध मानवी आरोग्यास हानिकारक असते.

दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर कासेतून बाहेर येणारं दूध, ग्राहकांच्या घरात जाईपर्यंत दुधातील सुक्ष्मजीवाणूंची संख्या गुणाकाराने वाढत असते. दुधामध्ये निरनिराळ्या प्रकारचे सुक्ष्मजीवाणू आढळून येतात. यातील काही जीवाणू हे मानवी शरीरासाठी अपायकारक असतात. दुधामध्ये सुक्ष्मजीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. या मध्ये धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता, दुधाची अस्वच्छ भांडी, दूध दोहनाची अस्वच्छ जागा या गोष्टी कारणीभूत असतात.

- १ मिलीलिटर दुधातील जीवाणूंची संख्या ४ ते ५ लाख असल्यास दुधाची गुणवत्ता चांगली असते.

- हीच संख्या ५ ते ४० लाख वाढल्यास दुधाची गुणवत्ता ही साधारण राहते.

- ही संख्या २०० लाखापर्यंत गेल्यास अशा दुधाची प्रत वाईट असते.

- जीवाणूंची संख्या २०० हून जास्त असल्यास हे दूध मानवी आरोग्यासाठी हितकारक नसते.

ग्रामीण भागात सर्वसाधारण प्रत्येक घरात दुधाचे उत्पादन होत असते. पण शहरी भागातील ग्राहकांना दुधासाठी डेअरीवरच अवलंबून राहावे लागते. दूध डेअरीवरती स्वच्छतेची योग्य ती काळजी न घेतल्यास बऱ्याचदा घरी आणलेले पिशवीतले दूधही नसलेलं आपण पाहतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT