काळजी पशुधनाची

दुग्धव्यवसायातील अर्थशास्त्र

दुग्ध व्यवसायात नफा म्हंटल कि उत्पादकांचे लक्ष दूध विक्रीकडे प्रथम जात असते. दूध महाग विकल्यानेच फायदा होत असतो, हा एक गैरसमज आहे.

Team Agrowon

डॉ.रावले हे.टा.

दुग्ध व्यवसायात नफा म्हंटल कि उत्पादकांचे लक्ष दूध विक्रीकडे प्रथम जात असते. दूध महाग विकल्यानेच फायदा होत असतो, हा एक गैरसमज आहे. उत्पादन किमंत आणि विक्री किंमत यामधील तफावत म्हणजे नफा होय. उत्पादन किंमत कमी केल्याने उत्पादकांचा नफा तर वाढेलच, सोबतच उपभोक्ते देखील दूध स्वस्त मिळाल्याने आनंदीत राहतील.

उत्पादन किंमत ही, जनावरांची किंमत, जनावरांचे खाद्य, चारा व पाणी व्यवस्थापन किंमत, दुधाची किंमत या तीन घटकांवर अवलंबून असते. आज आपण जनावरांच्या किंमतीबद्दल जाणून घेऊया-

- जनावरांची किंमत जर बाजाराच्या भरवश्यावर राहिली तर ती कधीच कमी होऊ शकत नाही. परंतु आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन योग्य प्रकारे करून ती उत्पादनक्षम केल्यास त्यांना चांगली किंमत मिळू शकते.

- दुभती जनावरे पुरविण्याच्या योजनांतर्गत, जनावरांचा विमा काढलेला असतो. त्यामुळे अनेक लाभार्थी पशुपालक उपचाराचा खर्च वाचवून, विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. या विम्याच्या पैशातून लाभार्थी दुसरे जनावर विकत घेतात. विम्याच्या पैशातून दुसरे जनावर विकत घेतले तरी, प्रत्यक्ष एक जीव कमी झालेला असतो. पैसा कधीही जनावरांसाठी पर्याय ठरू शकत नाही. यामुळे चांगल्या जनावरांची संख्या कमी होऊन, जनावरांच्या किंमती वाढलेल्या दिसून येतात.

- काही चांगल्या दुधाळ गायी-म्हशी भाकड झाल्यांनतr त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. कुपोषण झाल्याने त्यांची प्रजनन क्षमता तात्पुरती लोप पावते.

- वास्तविक गाभण जनावरांना त्यांच्या शारीरिक क्रियांसाठी, दूध उत्पादनासाठी, गर्भातील वासराच्या वाढीसाठी संतुलित आहार गरजेचा असतो. गाभण असताना जनावरे भाकड केले असता, गर्भातील वासराच्या वाढीसाठी आणि आणि पुढील वेतातील दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते.

- गायी-म्हशी विल्यानंतर वासरे किंवा पारडे त्यांना पुरेसे दूध तीन महिन्यापर्यंत मिळणे गरजेचं असते. नवीन जन्म झालेल्या खिल्लार नर वासरास गायीचे पूर्ण दूध पिऊ देण्याची पद्धत पशुपालकांमध्ये रूढ आहे. अशा परिस्थितीमध्ये जर गाय दुर्लक्षित राहिली तर दुधाचे उत्पादन कमी मिळेल. परिणामी वासराला योग्य प्रमाणात दूध मिळणार नाही.

- अनेक दूध उत्पादक शेतकरी गोठ्यात जन्मलेल्या वासरांना पुरेश्या प्रमाणात गायीचा चिक पाजत नाही. या दुधाची विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

- वासरांचे पोषण व्यवस्थित न झाल्याने त्यांना अनेक संसर्गजन्य आजाराची बाधा होत असते. गोठ्यात जन्मलेल्या वासरांचे योग्यरीत्या पोषण झाल्यास ही वासरे मोठी होऊन, चांगली किंमत देऊ शकतात.

डॉ.रावले हे.टा.

(9561517454)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT