Lumpy Vaccine Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : अकोल्याने ओलांडला दोन लाखांचा लसीकरण टप्पा

पशुपालकांना चिंतेत टाकणाऱ्या लम्पी स्कीन या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः पशुपालकांना चिंतेत टाकणाऱ्या लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला (Lumpy Skin Vaccination) वेग देण्यात आला आहे. या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) युद्धस्तरावर लसीकरण (Animal Vaccination) सुरू केले असून, आजपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ७,१०४ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित जनावरांचे लसीकरण सुरू आहे.

लम्पी स्कीन हा आजार ‘गो’ वर्गातील जनावरांचा त्वचा रोग असून, माणसामध्ये संक्रमित होत नसल्याने मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही.

तसेच बाधित गायीचे दूधदेखील सुरक्षित असून, त्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन रोगाने बाधित जनावरांची एकूण संख्या १,८०३ झाली आहे. हा आजार नियंत्रणासाठी बाधित जनावरांवर उपचार, अबाधितांचे लसीकरण, गोठा निर्जंतुकीकरण, गोचीड/गोमाश्‍या निर्मूलन इत्यादी उपाययोजनाद्वारे महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाद्वारे प्रयत्न केले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: ‘फार्मर आयडी’चे अपेक्षित लाभ कधी?

El Nino Forecast: ‘एल निनो’ मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची ९७ टक्के शक्यता

Dairy Business: तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे: अरुण चांभारे

Heavy Rain: धरण क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Soybean Seed Case: सोयाबीन बियाणे प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांची माहिती

SCROLL FOR NEXT