Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : फिरत्या पशुचिकित्सालयामुळे ‘लम्पी’चे ९० टक्के लसीकरण

गोठ्यातच पशुधनाला उपचार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने फिरते पशुचिकित्सालय (मोबाईल व्हॅन) सुरू केली आहे.

Team Agrowon

पुणे : गोठ्यातच पशुधनाला (Lumpy Skin) उपचार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने फिरते पशुचिकित्सालय (मोबाईल व्हॅन) सुरू केली आहे. या वाहनाद्वारे पशुधनावर उपचारास चांगलाच वेग आला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांना लसीकरणासाठी हे वाहन उपयुक्त ठरत आहे. यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्क्यांहून जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या जिल्ह्यात २५ मोबाईल वाहने कार्यरत आहेत. राज्यात पहिले फिरते पशुचिकित्सालय पुणे जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकारातून या वाहनाचा प्रभावी पद्धतीने वापर करण्यात येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात पशुधनाला वेळेत, परवडणाऱ्या दरात उपचार मिळत आहेत.

त्यासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास या मोबाईल वाहनांद्वारे ठरलेल्या गावातील पशुरूग्णास सेवा देण्यात येत आहे. तज्ज्ञ शासकीय पशुवैद्यक आणि वैद्यकीय उपकरणे या वाहनात असतात. त्यामुळे अन्य उपचारांसोबतच अवघड शस्त्रक्रियाही या वाहनाच्या मदतीने केल्या जात आहेत. विशेष म्हणजे ही सर्व वाहने जीपीएस प्रणालीने सुसज्ज आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT