Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : चिपळूणमध्ये ‘लम्पी स्कीन’ने ४४ जनावरांचा मृत्यू

चिपळूण तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव काही महिन्यांपूर्वी सुरू झाला. काही जनावरांना या रोगाची लागण झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते.

Team Agrowon

चिपळूण, जि. रत्नागिरी ः तालुक्यात लम्पी स्कीन रोगाचा (Lumpy Skin Disease) विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. तालुक्यात या रोगाने आतापर्यंत ४४ जनावरांचा बळी (Animal Death) घेतला आहे.

अन्य बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३० हजाराहून अधिक जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination) पूर्ण करण्यात आले आहे.

दरम्यान, फक्त ४ शेतकऱ्यांना शासनाकडून मदत (Government Help) देण्यात आली असून, २५ प्रस्ताव प्रतिक्षेत आहेत.

लम्पी स्कीनची अनेक भागांत जनावरांना लागण होत आहे. पशुसंवर्धन तसेच पशुवैद्यकीय विभाग लम्पी स्कीनची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असला तरी अद्याप त्यांना हवे तसे यश मिळालेले नाही.

चिपळूण तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव काही महिन्यांपूर्वी सुरू झाला. काही जनावरांना या रोगाची लागण झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते.

परंतु हा लम्पी स्कीन रोग नाही, असे नमूद करत लम्पी स्कीनची शक्यता नाकारण्यात येत होती; परंतु काही दिवसांतच सत्यता समोर आली. तोपर्यंत अनेक जनावरांना लागण झालेली होती.

चिपळूण तालुक्यात आतापर्यंत लम्पीमुळे तब्बल ४४ जनावरे दगावली असल्याची माहिती पुढे आली आहे तर अनेक जनावरांना या रोगाची लागण झाल्याचे देखील समोर येत आहे.

बाधित जनावरांवर पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाकडून उपचार केले जात आहेत. तसेच लसीकरणालादेखील वेग आला आहे.

आतापर्यंत तालुक्यात ३० हजार ८०६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जनावरांची मृत संख्या पाहता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, लम्पी स्कीनने दगावलेल्या जनावरांसाठी शासनाने मदत जाहीर केली. मृत गायींसाठी ३० हजार तर मृत बैलांसाठी २५ हजार इतकी शासकीय मदत दिली जात आहे.

त्या अनुषंगाने चिपळूण तालुक्यातून २९ शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

त्यापैकी अद्यापपर्यंत फक्त ४ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. तर २५ प्रस्ताव मंजूर झाले असले तरी अद्याप ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT