Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Compensation : लम्पी स्कीनमुळे मृत जनावरांच्या मालकांना तीन कोटींचे अनुदान

७८४ प्रस्ताव सध्या मंजुरीसाठी समितीकडे प्रलंबित आहेत. त्यांना आता ही मदत देण्यात येणार आहे.

Team Agrowon

सोलापूर ः लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin) मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना भरपाईपोटी अनुदान (Lumpy Skin Compensation) देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याला तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

राज्यासाठी पंधरा कोटींचा निधी मिळाला असून, त्यापैकी तीन कोटी रुपये एकट्या सोलापूर जिल्ह्याला मिळाले असून राज्यात सर्वाधिक निधी सोलापूरला मिळाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंतच्या अहवालानुसार लम्पी स्कीनमुळे (Lumpy) तीन हजार २७६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ९१० प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख ६ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.

यासंबंधीच्या समितीने मंजूर केलेले, परंतु अनुदान वाटपासाठी प्रलंबित असलेले १ हजार ३७६ प्रस्ताव असून, या प्रस्तावासाठी ३ कोटी ३२ लाख १० हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे.

७८४ प्रस्ताव सध्या मंजुरीसाठी समितीकडे प्रलंबित आहेत. त्यांना आता ही मदत देण्यात येणार आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये २३८७ पशुधन बाधित आहेत. दिवसेंदिवस लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी होतो आहे. ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव अनुदानासाठी पाठवले होते. त्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या तीन-चार दिवसांत अनुदानाची रक्कम जमा होईल.
डॉ. भास्कर पराडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT