Livestock Census  Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Census : हिंगोली जिल्ह्यात २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस प्रारंभ

Animal Care : पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. खुणे, सहायक आयुक्त डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले आहे.

Team Agrowon

Hinglo News : हिंगोली जिल्ह्यात २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस सोमवार (ता. २५) पासून प्रारंभ झाला आहे. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदी प्रजातींच्या जाती, लिंग आणि वय निहाय गणना करण्यात येणार आहे.

पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. खुणे, सहायक आयुक्त डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. ही पशुगणना सोमवार (ता. २५) ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण भागासाठी ७४ आणि शहरी भागासाठी ९ असे एकूण ८३ पशुगणनेसाठी प्रगणक तर ग्रामीण भागाकरिता २२ आणि शहरी भागासाठी ५ असे एकूण २७ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

प्रगणकाद्वारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी त्यांच्याकडील जनावराची माहिती प्रगणकांना देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT