Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी’ लसीकरणासाठी प्रति जनावरामागे २० रुपये आकारणी

लस मोफत असताना पशुसंवर्धन विभाग पोहचत नसल्याचा आरोप

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) निष्पन्न झाल्याने पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) युद्ध पातळीवर काम सुरू केले. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर कर्मचारी मेहनत घेत आहेत. परंतु काही खासगी पशुवैद्यक (Lumpy Skin Vaccination) जनावरांमागे २० रुपये आकारत असल्याने करंजगाव (ता. निफाड) येथील पशुपालकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाबूराव नरवडे यांच्याकडे तक्रार केली आहे.

‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून जनावरांना प्रादुर्भाव नको, यासाठी सावध पवित्रा घेत लसीकरण करून घेतले जात आहे. मात्र लस मोफत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

असे असताना पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण होत नसल्याने ही तक्रार करण्यात आली आहे. या बाबत निफाड तालुक्यातील करंजगाव येथील पशुपालकांनी ही कैफियत ‘ॲग्रोवन’कडे मांडली आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ही लस दिल्यास ती मोफत मिळते; तसेच खासगी पशुवैद्यकाने पशुसंवर्धन विभागाकडून लस घेऊन दिल्यास तीही मोफत आहे. त्यापोटी खासगी पशुवैद्यकांना प्रति जनावर तीन रुपये देण्याची तरतूद पशुसंवर्धन विभागाने केली आहे. त्यामुळे पशुपालकांकडून पैसे मागण्याचा किंवा दर आकारण्याचा कुठलाही मुद्दा उपस्थित होत नाही, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाबुराव नरवडे यांनी दिली.

पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांच्या दारात का जात नाही?

जनावरांना लस देण्याकरिता खासगी कर्मचारी काम करत आहेत. मात्र शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी लस देण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारात का जात नाही? या संदर्भात मोठा प्रश्न पडला आहे. जनावरांना ‘लम्पी’ आजाराची लस नक्की दिली जाते का? लस मोफत असताना २० रुपये घेत आहेत. हा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राम राजोळे यांनी लक्षात आणून देत पशुसंवर्धन विभागाचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

शासकीय लस खरेदीचा दर हा प्रति लस ५ रुपये २५ पैसेप्रमाणे आहे. ही लस खासगी व्यक्तीने दिल्यास ती मोफत असून त्यापोटी ३ रुपये प्रति जनावर असे शुल्क पशुसंवर्धन विभाग देणार आहे.परंतु अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्यास या बाबत समज देता येईल. खासगी पशुवैद्यकांवर पशुसंवर्धन विभागाचे तसे नियंत्रण नाही. लसीकरण मोफत असल्याने पशुपालकांनी कुठलेही पैसे देऊ नये.
डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
शासनाचे लसीकरण पूर्णपणे निःशुल्क आहे. जो काही प्रकार घडला आहे. त्याची शहानिशा करून योग्य ती चौकशी केली जाईल.
डॉ. रवींद्र चांदोरे, पशुधन विकास अधिकारी-श्रेणी १, पशुवैद्यकीय दवाखाना, कोठुरे, ता. निफाड
१२ रुपये प्रमाणे खासगी लस मिळते. उत्पादक कंपन्यांप्रमाणे दर बदलतात. ‘लम्पी’ निर्मूलन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कुठलेही अधिक दर घेत नाहीत. -

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा आवक कायम, कांद्याच्या भावात वाढ, मेथी बाजारात चढ-उतार, शेवगा दरात बदल तर पपईच्या दरात वाढ

Maharashtra Protest Cases: राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ, शासन निर्णय जारी

Agricultural Training: कृषी विस्तारकार्याला अधिक गतिमान करा : डॉ. इंद्र मणी

Gajar Gavat Control: गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय करावे?

Workers Protest: असंघटित कष्टकऱ्यांचे पैठण गेटवर धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT