Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : एका दिवसात १४ जनावरांचा मृत्यू

लम्पी स्कीन आजारामुळे मृत पावणाऱ्या जनावरांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.२५)एका दिवशी १४ जनावरांचा मृत्यू झाला.

टीम ॲग्रोवन

नागपूर : लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy Skin Disease) मृत पावणाऱ्या जनावरांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.२५)एका दिवशी १४ जनावरांचा मृत्यू (Animal Death) झाला. मृत पशुधनांचा आकडा १४९ वर गेला आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लम्पी स्कीन आजाराचा विळखा वाढत आहे. गुरुवारला लम्पी स्कीनमुळे मृत पावणाऱ्या जनावरांचा आकडा १३५ होता. तर, शुक्रवारी हा आकडा १४९ च्या घरात गेला. लम्पी स्कीनचा संसर्ग सर्व १३ तालुक्यांत पसरला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ४ लाख १८ हजार ५४८ आहे. ३८८ गावांमधील ३,१२३ जनावरांना याची बाधा झाली आहे.

६८४ जनावरांवर औषधोपचार सुरू असून ४० जनावरे गंभीर आहेत. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण प्रभावी उपाय सांगण्यात येते. शासनाकडून ४ लाख १५ हजार लसी प्राप्त झाल्या असून, ४ लाख २ हजार ९४५ जनावरांचे लसीकरण झाले.

लम्पी स्कीनच्या नियंत्रणसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यानंतर या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. परंतु मृत पावणाऱ्या जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT