Lumpy Skin Disease  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीनमुळे पुणे जिल्‍ह्यात १ हजार २२६ पशुधनाचा मृत्यू

लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यातील एक हजार २२६ पशुधनांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६८२ गाई, १६१ बैल आणि १६३ वासरांचा समावेश आहे.

Team Agrowon

Pune News पुणे ः लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यातील एक हजार २२६ पशुधनांचा (Livestock Death) आतापर्यंत मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६८२ गाई, १६१ बैल आणि १६३ वासरांचा समावेश आहे.

यापैकी सुमारे ७०० पशुधन मालकांना प्रति पशुधन ३० हजार रुपये (मोठे) आणि १६ हजार रुपये (लहान) याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर, उर्वरित पशुपालक अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

पुणे जिल्ह्यात सुमारे सहा महिन्यांपूर्वी (२६ ऑगस्ट २०२२) लम्पी स्कीन आजाराने बाधित झालेले पहिले पशुधन आढळले होते. तेव्हापासून आतापर्यंत १ हजार २२६ पशुधनांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू झाला.

या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आतापर्यंत या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना येत्या मार्च अखेरपर्यंत ही आर्थिक मदत वितरित करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील पशुधनाच्या मृत्यूची आकडेवारी

- एकूण मृत्यू- १ हजार २२६

- गाईंची संख्या- ६८२

- बैलांची संख्या- १६३

- वासरांची संख्या- १६१

- अन्य पशुधनाची संख्या- २२०

आर्थिक मदतीचे स्वरूप

- प्रति पशुधन- ३० हजार रुपये (मोठे)

- प्रति पशुधन- १६ हजार रुपये (छोटे)

दृष्टीक्षेपात

पुणे जिल्ह्यातील पशुधनांची संख्या

- गाय-म्हैसवर्गीय एकूण जनावरे- ८ लाख २४ हजार

- एकूण पशुधनातील बैलांची संख्या- १ लाख २२ हजार

- दुभत्या गाईंची संख्या- ४ लाख ३४ हजार ४००

- एकूण म्हशी- २ लाख ६७ हजार ६००

- दुभत्या म्हशींची संख्या- १ लाख ७५ हजार

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मृत्यू

लम्पी स्कीन या आजारामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक ३४१ मृत्यू हे इंदापूर तालुक्यात झाले असून सर्वांत कमी म्हणजे अवघा १ मृत्यू वेल्हे तालुक्यात झाला आहे.

तालुकानिहाय पशुधनाच्या मृत्यूची संख्या

आंबेगाव- ५८

बारामती- १७१

भोर- १७

दौंड- ७४

हवेली- ६२

इंदापूर- ३४१

जुन्नर- ६२

खेड- ११०

मावळ- ५२

मुळशी- ०८

पुरंदर- ५२

शिरूर- २१८

वेल्हे- ०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT