Seed Treatment Agrowon
ॲग्रो गाईड

Seed Treatment : बिजप्रक्रिया का आहे गरजेची ?

अन्नद्रव्यांच्या बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून त्यांची उगवण क्षमता व पीक वाढीची गती वाढते. त्यामुळे बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

रब्बी हंगाम (Rabbi Season) होऊ घातला आहे. हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, गहू,  पिकाच्या पेरणीला वेग आला आहे. पेरणीपुर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि रोगापासून संरक्षण होण्यासाठी बियाण्यावर बिजप्रक्रिया (Seed Treatment) करणे आवश्यक आहे. काही शेतकरी बिजप्रक्रियेला महत्व देत नाहीत. त्यामुळे बिज प्रक्रिया न करताचा पेरणी केली जाते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. बिजप्रक्रियेमध्ये सुक्ष्मअन्नद्रव्ये आणि बुरशीनाशक प्रक्रियेचा समावेश होतो. बियाण्यांतील पोषक द्रव्यांच्या आधारेच सुरुवातीच्या काळात रोपांची वाढ व विकास होत असतो. अन्नद्रव्यांच्या बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून त्यांची उगवण क्षमता व पीक वाढीची गती वाढते. त्यामुळे बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीज प्रक्रिया करताना काय काळजी घ्यावी?

बियाण्यास बीजप्रक्रिया करताना भौतिक अपाय होऊ देऊ नयेत. 

सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण किंवा तीव्रता अधिक झाल्यास बियाणे खराब होऊ शकते. 

चुकीच्या अन्नद्रव्यांच्या वापरामुळे व तीव्र प्रमाणामुळे बियाणांच्या उगवण शक्तीवर परिणाम होऊ शकतो. 

प्रथम उगवणक्षमतेची चाचणी घेऊन बीज प्रक्रियेबाबत प्रयोग करावेत. 

जमिनीत बीज प्रक्रियेशी संबंधित अन्नद्रव्याची मात्रा भरपूर असल्यास फायदेशीर परिणाम दिसून येईलच असे नाही. 

सूक्ष्म अन्नद्रव्ये बीजप्रक्रिया पद्धतीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

बीज प्रक्रियेद्वारे पीक पोषणाचे फायदे  

सर्वच प्रकारच्या रसायनांसोबत तसेच जिवाणू खतांसोबतदेखील वापर करता येतो. 

अन्नद्रव्यांच्या समान वाटपामुळे संपूर्ण पिकाला समान वाढ व विकासाकरिता फायदा होतो. 

उगवणक्षमता तसेच मुळांची संख्या यामध्ये वाढ होऊन पाणी व अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते. 

अन्नद्रव्यांच्या बीज प्रक्रियेमुळे अजैविक ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ होते. तसेच जमिनीद्वारे दिलेल्या अन्नद्रव्याच्या कार्यक्षमतेतदेखील वाढ होते. 

जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारे अनिष्ट परिणाम टाळता येतात. 

बीज प्रक्रियेमुळे अन्नधान्यातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT