Soil Health Agrowon
ॲग्रो गाईड

Soil Health : जमीन चोपण किंवा चिबड का होते?

Soil Fertility : जमिनीवर सतत पाणी साठून राहील्यामुळे, जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा न झाल्यामुळे याशिवाय पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे जमीन चोपण किंवा चिबड बनते. अशा जमिनीत पिकाची नीट वाढ होत नाही.

Team Agrowon

Soil Health : पिकाची वाढ होण्यासाठी जमीन हे महत्वाच माध्यम आहे. माती, सेंद्रिय घटक, हवा आणि पाणी हे जमिनीचे प्रमुख चार घटक आहेत.

मात्र  जमिनीवर सतत पाणी साठून राहील्यामुळे, जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा न झाल्यामुळे याशिवाय पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे जमीन चोपण किंवा चिबड बनते. अशा जमिनीत पिकाची नीट वाढ होत नाही. 

चिबड जमीन कशी ओळखावी?

चिबड जमिनीत विनीमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते व सामू ८.५ ते १० पर्यंत असतो. मातीचे हे सर्व गुणधर्म माती परिक्षणातून तपासता येतात. चिबड जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. वाळल्यावर जमीन टणक होते. भेगा पडतात, जमीन ओली असेल तेंव्हा अतीशय चिबड होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही त्यामुळे पिकाची वाढ योग्य होत नाही.   

चिबड जमिनीत कोणत्या पिकांची निवड करावी?

१) अन्नधान्य पिके - ऊस, कापूस, भात, ज्वारी

२) भाजीपाला पिके - पालक, शुगरबीट

३) वन पिके - विलायती बाभूळ, सुरु, सिसम, निलगिरी

४) चारा पिके - लसूणघास, बरसीम, बरमुडा गवत

ज्या जमिनीत मातीच प्रमाण ४५ टक्के, ५ टक्के सेंद्रिय घटक आणि हवा आणि पाण्याच प्रत्येकी २५ टक्के प्रमाण असतं अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. जमिनीची संरचना किंवा घडण उत्तम राहण्यासाठी जमिनीची योग्य मशागत व सेंद्रिय पदार्थांचा भरपूर वापर करावा. पिकाची फेरपालट करावी. पिकाची फेरपालट करताना कडधान्य वर्गातील पिकांचा समावेश केल्यास जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व सुपीकता वाढते. 

--------------

स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT