Animal Care
Animal Care Agrowon
ॲग्रो गाईड

Animal Care : जनावरांसाठी खनिजे का आहेत आवश्यक?

Team Agrowon

जनावरांचा आहार आणि प्रजननाचा (Reproduction) घनिष्ठ संबंध आहे. पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतात. खनिजे, जीवनसत्त्वे, ऊर्जा आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे तसेच प्रथिनांचे खाद्यामधील अति प्रमाण देखिल जनावरांसाठी हानीकारक ठरतात. यामध्ये वांझपणा, जनावर माजावर न येणे इ. लक्षणे दिसून येतात. जनावरांना पाणी, तेलयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, क्षार आणि जीवनसत्त्वे या पोषणमूल्यांची आवश्यकता असते. यामध्ये प्रजननासाठी आवश्यक असलेल्या खनिजे आणि त्याचे कार्य याविषय़ी माहिती पाहुया. 

प्रजननासाठी महत्त्वाची खनिजे आणि त्यांचे कार्य 

१. कॅल्शिअम हे दुग्धोत्पादन, हाडे व दातांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणासाठी आवश्यक असते. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रसूती सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. कारण गर्भाशयाच्या स्नायू आकुंचन-प्रसरण क्रियेमध्ये अडथळा येतो.

२. फॉस्फरस दुग्धोत्पादन, चयापचय आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन चक्र अनियमित होते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.

३. मॅग्नेशियममुळे हाडे व दात मजबूत होतात. मॅग्नेशियम प्रथिनांचे उत्पादन तसेच कर्बोदकावरील क्रियेसाठी आवश्यक आहे.

४. सल्फर प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकावरील क्रियेसाठी उपयुक्त आहे. 

५. सोडिअम व पोटॅशिअम शरीरातील अभिसरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकवून ठेवण्याचे कार्य करते.  

६. तांबे, कोबाल्ट रक्तातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आवश्यक आहे. बऱ्याचशा संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. तांबे, कोबाल्ट च्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये वांझपणा दिसून येतो.

७. झिंक शुक्रजंतूंच्या निर्मितीसाठी आणि लैंगिक अवयवांच्या प्राथमिक आणि त्यापुढील वाढीसाठी महत्त्वाचे आहे. झिंक वळूंची प्रजनन क्षमता टिकून ठेवण्यासाठी आणि वळूंकडून चांगल्या वीर्याची निर्मिती होण्यासाठी आवश्यक ठरते.

८. मँगेनीज कर्बोदकांच्या उत्पादनासाठी कार्य करणाऱ्या शरीरातील अनेक अंतस्रवांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. शारीरिक वाढीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी आवश्यक. मँगेनीजच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक्र अनियमित होते. गर्भपात होऊन मृत आणि दुबळे आणि केसविरहित गलगुंड असलेले वासरू जन्माला येते. जनावर मुका माज दाखविते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT