Mung, Urad Variety  Agrowon
ॲग्रो गाईड

Mung, Urad Variety : या आहेत मूग, उडीदाच्या सुधारित जाती

Mung, Urad Cultivation : खरीप हंगामातील मूग व उडीद ही महत्त्वाची कडधान्य पिके आहेत. कमी कालावधीमध्ये येणारी व अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडीद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.

Team Agrowon

Mung, Urad Crop : खरीप हंगामातील मूग व उडीद ही महत्त्वाची कडधान्य पिके आहेत. कमी कालावधीमध्ये येणारी व अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडीद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. मूग आणि उडीद जमिनीचा पोत सुधारण्याचेही काम करतात.

मात्र अलीकडे काढणीच्या वेळी पडणारा अतीपाऊस, वाढता कीड, रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांमुळे मूग उडीदाच्या लागवडीत घट होऊ लागली आहे. तरिही काही शेतकरी मूग, उडदाची लागवड मुख्य व आंतरपीक म्हणून करतात.

साधारणपणे या पिकांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यांचा असतो. चांगल्या उत्पादनासाठी योग्य जातीची निवड ही अतिशय महत्वाची बाब आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मूग, उडदाच्या सुधारित जातींची लागवड करावी याविषयी ची माहिती आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.  

मूगाचे सुधारित वाण

मुगाचे पीकेव्ही -८८०२ हे लवकर व एकाच वेळी पक्व होणार वाण आहे. हे वाण भुरी रोगास मध्यम तसेच मावा या रस शोषक किडीस साधारण प्रतिकारक आहे.

हे वाण साधारणपने ६० ते ६५ दिवसात तयार होते तर या वाणाची सरासरी उत्पादकता १० ते ११ क्विंटल आहे. 

मुगाचे दुसरे सुधारित वाण आहे पीकेव्ही ग्रीनगोल्ड. हे वाण अधिक उत्पादन देणारं असून लवकर व एकाच वेळी पक्व होणारे आहे.

हे वाण साधारणपने ६८ ते ७२ दिवसात काढणीला तयार होतं. हे वाण भुरी रोगास मध्यम प्रतिकारक असून  वाणाची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल आहे. 

मुगाचे पीकेव्ही एकेएम-४ हे वाण भुरी आणि करपा रोगास प्रतिकारक आहे. या वाणाचा पक्वतेचा कालावधी ६५ ते ६७ दिवसाचा आहे. वाणाची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल आहे.

उडदाचे सुधारित वाण कोणकोणते आहेत

उडदाच्या टीएयू-१ या वाणाची राज्यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड होते. हे वाण भुरी रोगास मध्यम प्रतिकारक असून पक्वतेचा कालावधी ६५ ते ७२ दिवसांचा आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल आहे.

उडदाचे पीकेव्ही उडीद-१५ केवडा आणि भुरी रोगास प्रतिकारक आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल आहे.

उडदाचे तीसरे महत्वाचे वाण म्हणजे पीडीकेव्ही ब्लॅकगोल्ड. हे वाण अधिक उत्पादन देणारे आहे. या वाणाचा पक्वतेचा कालावधी ७१ दिवसांचा आहे असून सरासरी उत्पादकता  १३ ते १५ क्विंटल आहे. 

अशा प्रकारे योग्य वाणाची निवड करुन बियाण्याला बिजप्रक्रिया करुनच मूग, उडदाची पेरणी करावी. पेरणीपुर्वी बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणाकरिता प्रति किलो बियाण्यास, कार्बोक्झिन किंवा थायोमिथोक्झाम ५ ग्रॅम याप्रमाणे चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे. रायझोबिअम व स्फुरद विरघळवण्यारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे गुळाच्या थंड द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे. प्रक्रियेनंतर बियाणे सावलीत वाळवून ८ तासांच्या आत बियाणे पेरणीसाठी वापरावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT