Summer Agrowon
ॲग्रो गाईड

उन्हाचा चटका कायम राहणार

राज्यात उन्हाचा चटका कायम असल्याने कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३० ते ३५ अंशांदरम्यान आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात उन्हाचा (Summer) चटका कायम असल्याने कमाल तापमानाचा (temperature) पारा सातत्याने ३० ते ३५ अंशांदरम्यान आहे. किमान तापमानात मात्र चढ-उतार सुरूच आहे. परिणामी राज्यात दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावत कायम आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, किमान तापमानात (temperature) हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

केरळपासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बिहारपासून पूर्व विदर्भापर्यंत असलेले कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. गेले दोन ते तीन दिवसांपासून वाढलेला किमान तापमानाचा (temperature) पारा सोमवारी अचानक घसरला. सोमवारी (ता. २१) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात (Wheat Research Centre) किमान तापमानात मोठी घट झाल्याने ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात (Agriculture - college) ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

यातच उन्हाचा (Summer) वाढलेला चटका कायम असल्याने सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची (temperature) नोंद झाली. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा, परभणी, अकोला, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३३ अंशांपेक्षा अधिक आहे.

सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (temperature) (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६ (११.६), धुळे ३३.० (९.०), जळगाव ३३.६ (११.४), कोल्हापूर ३३.६ (१८.४), महाबळेश्वर २८.६ (१५.४), मालेगाव ३३.० (१४.०), नाशिक ३१.८ (११.३), निफाड २९.८ (६.५), सांगली ३४.९ (१७.१), सातारा ३३.१(१४.७), सोलापूर ३५.४ (१८.१), सांताक्रूझ ३१.९(१७.१), डहाणू २८.६ (१७.४), रत्नागिरी ३२.६ (१७.४), औरंगाबाद ३२.३ (१५.२), नांदेड - (१६.८), उस्मानाबाद - (१७.०), परभणी ३३.६ (१६.५), अकोला ३४.३ (१५.२), अमरावती ३२.८ (१४.७), बुलडाणा ३१.८ (१४.७), ब्रह्मपुरी ३२.३ (१५.४), चंद्रपूर ३२.८ (१४.२), गडचिरोली ३०.०(१५.०), गोंदिया ३१.८ (१४.२), नागपूर ३२.१ (१२.४), वर्धा ३३.६(१४.५), वाशीम ३२.५ (१५.०), यवतमाळ ३३.० (१३.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT