Water Agrowon
ॲग्रो गाईड

Nar Par Project : ‘नार-पार’च्या पाण्याची गिरणा पट्ट्याला आस

Nar Par : नार-पार गिरणा नद्याजोड प्रकल्पासाठी साधारणत: साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातून ११ टीएमसी पाणी उपलब्ध होऊन अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : भडगाव, जि.जळगाव : नार-पार गिरणा नद्याजोड प्रकल्पासाठी साधारणत: साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातून ११ टीएमसी पाणी उपलब्ध होऊन अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे गिरणा पट्टा सुजलाम् सुफलाम् होऊन सिंचनात आबादानी होणार आहे. त्यासाठी पाठपुरावा व राजकीय स्तरावरून गतीने कार्यवाही अपेक्षित आहे. 

आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार गिरणा, दमणगंगा-वैतरणा गोदावरी व दमणगंगा एकदरे गोदावरी हे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्याच्या निधीतून त्वरित हाती देण्यास राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे पन्नास वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांना चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेषत: गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

नार-पार या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे. यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागांत याचा लाभ होणार आहे. यामुळे साधारत: अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाने झोडपले; धरणांतून विसर्ग

Legislature Adjourned: विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण

Monsoon Disaster: बारा जणांचे मृत्यू सुलतानी कारभारामुळे; काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT